विशेष प्रतिनिधी
पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वीच एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्निल लोणकरची आत्महत्या ताजी असतानाच, एसपीएससीची तयारी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. मल्हारी नामदेव बारवकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. मल्हारी दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील रहिवासी आहे.महाराष्ट्रात परीक्षांचा घोळ सुरूच आहे .त्यातच अनेक होतकरू तरूण होरपळून निघत आहेत.त्यामुळे ही आत्महत्या नसून महाविकास आघाडी सरकारने केलेली हत्या असल्याचा संताप सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. MPSC Student Suicide
मल्हारी बारवकर हा 25 वर्षांचा होता. तो एमपीएससीच्या पुर्व परीक्षेची तयारी करत होता. या आधी दोन तीन पूर्व परीक्षेचे पेपरही त्याने दिले होते. मात्र, त्यात यश आलं नाही. याच नैराश्यातून शुक्रवारी (17 डिसेंबर) त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं घरच्यांची सांगितली आहे.
मल्हारी हा गरीब कुटुंबातून असून, त्याचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात मैलकोली आहेत. नैराशातून त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती कुटुंबातील व्यक्तींनी दिली आहे. मल्हारने लिहिलेली सुसाईड नोट त्याच्या नातेवाईकांना मिळाली आहे. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनीदेखील मल्हारीचा सुसाईड नोटबद्दल दुजोरा दिला आहे.
मल्हारीने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की, “मी तुम्हाला दाखवलेलं स्वप्न आता पूर्ण करू शकत नाही आणि तुमचे पडलेले चेहरेही पाहू शकत नाही. आत्महत्येस जबाबदार नाही. अतिविचार, संपलेला आत्मविश्वास, भविष्यातही काही सकारात्मक चित्र दिसत नाही. चांगलं जगण्याच्या सगळ्या आशा संपल्या आहेत, सॉरी” अशा भावना या सुसाईड नोटमध्ये मल्हारीने व्यक्त केल्या आहेत.महत्त्वाचं म्हणजे एमपीएससी परीक्षेसंदर्भात गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या लढ्यात मल्हारी देखील सक्रिय होता.
MPSC Student Suicide
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App