विशेष प्रतिनिधी
पुणे : आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून पुणे शहरात आंदोलनास सुरुवात केली. या आंदोलनाचे राजकीय पडसाद उमटले. काल या आंदोलनात जाऊन आमदार रोहित पवारांनी विद्यार्थी आंदोलनातून भारतात “बांगलादेश” घडणार असल्याची भाषा वापरली. आता आज शरद पवार विद्यार्थी आंदोलनात उतरले. मात्र, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंती केली असून आज महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल आंदोलनस्थळी जात विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला. आता शरद पवार यांनी देखील ट्विट करत लवकरच तोडगा काढण्याचं आवाहन केले. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार, असं शरद पवारांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
ADR report : ADRचा अहवाल- देशातील 151 लोकप्रतिनिधींवर महिलांविरुद्ध गुन्ह्यांचा आरोप; राज्यांमध्ये पश्चिम बंगालच्या खासदार-आमदारांविरुद्ध सर्वाधिक खटले
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होणार आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे. आज दुपारी एक बैठक घेऊन त्यात यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे त्यांनी मला आश्वस्त केले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App