विशेष प्रतिनिधी
अमरावती : मेळघाटातील हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनखात्याने नमेलेल्या चौकशी समितीने थातूर मातूर अहवाल दिला आहे. ही समितीबदलून नव्या समितीमार्फत चौकशी करून न्याय द्यावा, अश मागणी खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री भूपेंदर यादव यांना पत्र लिहून केली आहे.MP Navneet Rana writes to Prime Minister and Union Ministers in Deepali Chavan suicide case
दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनबल खात्याचे प्रमुख पी. साईप्रसाद यांनी ३० मार्च २०२१ रोजी स्वतंत्रपणे नऊ सदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय घेतला होता. समितीचे अध्यक्ष अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांच्याकडे दोन महिन्यात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
या समितीने तीन उपसमितीचे गठन केले होते. मात्र, एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्याच्या कालावधीत राव यांनी केवळ अनास्था दर्शविली. अखेर राव यांनी ३१ आॅगस्ट रोजी निवृत्तीच्या दिवशी थातुरमातुर अहवाल सादर केला. त्यामुळे दीपाली यांच्या मृत्यूनंतर न्याय मिळण्यासाठी नवीन समिती गठित करावी, असे राज्य शासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार राणा यांनी केली आहे.
वन खात्याने गठित केलेल्या नऊ सदस्यीय समितीतील अधिकारी हे रेड्डी यांचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे समिती बदलावी आणि सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली नव्या समितीचे गठन करावे, असेही राणा यांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App