विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या भव्य लसीकरण मोहिमेअंतर्गत बुधवारी संध्याकाळी ७ पर्यंत ८२८०० जणांचे लसीकरण नोंदणी पार पडली.
या लसीकरण मोहिमेचे उद्दिष्ट हे या संख्येपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्याचे होते. प्रशासनाचे निर्णय २ लाख जणांचे लसीकरण एका दिवसात करण्याचे होते. प्रशासनाकडे २.१७ लाख लसींचे डोस अजूनही शिल्लक राहिलेले आहेत.
More than 82k doses administered in kolhapur on Wednesday
जिल्हा लसीकरण अधिकारी फारुख देसाई यांच्या म्हणण्यानुसार बुधवारी जे लसीकरण करण्यात आले ते इतर दिवशीच्या तुलनेने अडीचपट जास्त होते. फारुख देसाई यांनी यामागचे काय कारण आहे, हे लवकरच शोधण्यात येईल असे सांगितले.
सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत जास्तीत जास्त लाभार्थी हे लसीकरणासाठी येतात. प्रत्येक लसीकरण केंद्रामध्ये जवळपास ५०० लाभार्थ्यांना लसीकरण देण्याची प्रशासनाची योजना होती. १८ ते ४४ या वयोगटातील लाभार्थी हे जास्त होते. बुधवारी जास्तकरून ग्रामीण भागातून लसीकरणाची केंद्र जास्त असल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढली असल्याचे प्रशासनाने सांगितले.
WHO ने गंभीर कोविड रुग्णांसाठी अँटीबॉडी उपचारांची शिफारस केली
प्रशासनाने आता वॉक इन रजिस्ट्रेशनची सोय करून दिली आहे. १८ वर्षावरील पुढील नागरिकांसाठी हि मोहीम आखली गेली होती. आत्तापर्यंत २३ लाख नागरिकांची पहिली लस रजिस्टर झाली आहे. त्यापैकी ९ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट एकूण ३१ लाख नागरिकांना लस देण्याचे होते. १ ऑक्टोबर रोजी ‘इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन्स’ च्या निमित्ताने ६० वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्याची योजना आखण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App