संसदेचे पावसाळी अधिवेशन : निदर्शने करणारे काँग्रेसचे 4 खासदार अधिवेशनापुरते निलंबित, लोकसभा अध्यक्षांची कारवाई


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या काँग्रेसच्या 4 खासदारांना अधिवेशन संपूर्ण काळासाठी निलंबित केले. काँग्रेसचे खासदार ज्योतिमणी, मणिक्कम टागोर, टी.एन. प्रथापन आणि राम्या हरिदास यांनी महागाईविरोधात पोस्टर दाखवत सभागृहात घोषणाबाजी केली होती.Monsoon Session of Parliament 4 protesting Congress MPs suspended for session, Lok Sabha Speaker’s action

अधिवेशनाच्या सुरुवातीपासून विरोधी पक्ष महागाई, खाद्यपदार्थांवरील जीएसटी या मुद्द्यांवरून कामकाजात अडथळा आणत आहेत. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई म्हणाले, सरकार खासदारांना निलंबित करून लोकांचे मुद्दे उचलल्यामुळे धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. खासदारांची चूक काय होती? त्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीतील वाढ, पीठ, दूध, पनीर आणि ताक यासारख्या वस्तूंवर जीएसटी लावण्याविरोधात फलक घेतले होते. आम्ही यावर चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव दिला, मात्र चर्चा झाली नाही. याआधी गदारोळादरम्यान अडीच वाजता कामकाज स्थगित केले होते.



पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा वाया गेला

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची पार्श्वभूमी होती. अधिवेशनाच्या या टप्प्यात खासदारांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी वेळ देण्यात आला. त्यासाठी दोन्ही सभागृहे तहकूब करण्यात आली होती. त्यानंतरच्या 4 दिवसांत विरोधकांनी महागाईच्या मुद्‌द्यावरून गदारोळ केल्याने लोकसभा तहकूब केली.

Monsoon Session of Parliament 4 protesting Congress MPs suspended for session, Lok Sabha Speaker’s action

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात