Monsoon Forecast : मागच्या तीन दिवसांपासून मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले आहे. सोमवारी सकाळपासून काही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलयम होऊन सखल भागात पाणी साचले आहे. हवामान खात्याने पुढील 5 दिवस मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. Monsoon Forecast By IMD Mumbai says Next five Days Heavy to Very Heavy rainfall in Mumbai Konkan Region
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागच्या तीन दिवसांपासून मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले आहे. सोमवारी सकाळपासून काही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलयम होऊन सखल भागात पाणी साचले आहे. हवामान खात्याने पुढील 5 दिवस मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Severe weather warnings over the region during next 5 days. Kindly visit https://t.co/89p4H3QwEY… for detailed district wise forecast and warnings. pic.twitter.com/FYgThsXJgd — Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 18, 2021
Severe weather warnings over the region during next 5 days. Kindly visit https://t.co/89p4H3QwEY… for detailed district wise forecast and warnings. pic.twitter.com/FYgThsXJgd
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 18, 2021
दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी भागात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. या दुर्घटनेमध्ये दोन्ही ठिकाणी मिळून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येक दोन लाख व जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये व जखमींना मोफत उपचारांची घोषणा केली आहे. मुंबईत रात्रभर पाऊस सुरु असून मुख्यमंत्री स्वत: पालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून सातत्याने माहिती घेत आहेत. आजही पाऊस सुरूच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे व कुठेही दुर्घटना घडल्यास त्वरित बचाव कार्य सुरु ठेवावे व मदत पोहचवावी असेही त्यांनी निर्देश दिले आहेत. मुंबईतील मिठी नदी व इतर मोठ्या नाल्यांलगत पाणी वाढल्यास आसपास राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो हे पाहून त्यांना प्रसंगी स्थलांतरित करावे. कोविड संसर्ग लक्षात घेऊन जम्बो केंद्रामधील रुग्ण तसेच इतर साधन सामुग्री यांची काळजी घ्यावी व सावध राहण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी पालिकेस सांगितले.
Monsoon Forecast By IMD Mumbai says Next five Days Heavy to Very Heavy rainfall in Mumbai Konkan Region
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App