मॉन्सून महाराष्ट्रात , नियोजित वेळेपूर्वीच आगमन झाल्याने आनंद, कोकणातील हर्णेपासून ते सोलापूरपर्यंत पोहोचला

मॉन्सूनचे महाराष्ट्रात आनंददायी आगमन झाले आहे. कोकणातील हर्णेपासून ते सोलापूरपर्यंत पोहोचलेला मॉन्सून शेतकऱ्यांसाठी आनंद घेऊन आला आहे Monsoon arrives in Maharashtra from Harne in Konkan to Solapur


प्रतिनिधी

पुणे : मॉन्सूनचे महाराष्ट्रात आनंददायी आगमन झाले आहे. कोकणातील हर्णेपासून ते सोलापूरपर्यंत पोहोचलेला मॉन्सून शेतकºयांसाठी आनंद घेऊन आला आहे
केरळमध्ये ३ जूनला आगमन झाल्यानंतर मॉन्सूनने गेल्या दोन दिवसात वेगवान प्रवास करीत महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. दक्षिण कोकणातील हणेर्पासून सोलापूरपर्यंत मॉन्सूनचे आगमन झाले असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.



३ जून रोजी केरळमध्ये आगमन झाल्यानंतर त्याने शुक्रवारपर्यंत कर्नाटकातील कारवारपर्यंत मॉन्सूनने वेगवान वाटचाल केली होती. त्यात आणखी प्रगती केली असून गोव्यासह कोकणातील हर्णे तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर व लगतच्या मराठवाड्यातील काही भागापर्यंत मजल मारली आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नव्या वेळांनुसार दक्षिण कोकण, ७ जून, कोल्हापूर ९ जूनपर्यंत मॉन्सूनचे आगमन होत असते. यंदा मात्र, मॉन्सून एक्सप्रेस सुसाट सुटली आहे. निर्धारित वेळेपूर्वीच महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.गेल्या काही वर्षात मॉन्सूनचे इतक्या लवकर प्रथमच आगमन होत आहे.

अंदमान बेटांवर २१ मे रोजी मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर बंगालच्या उपसागरात यास चक्रीवादळ तयार झाले. त्यामुळे मान्सूनला चाल मिळाल्याने गुरुवारी मान्सूनने श्रीलंकेसह मालदीव आणि कोमोरीन समुद्राच्या काही भागांत वाटचाल केली.

हवामान खात्याने २७ मे रोजी ३१ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असे म्हटले होते, मात्र सर्वसामान्यपणे देशात १ जूनपर्यंत मान्सून दाखल होतो. मात्र नंतर मान्सून ३ जूनपर्यंत देशात दाखल होईल, असे हवामान खात्याने म्हटले होते. दरवर्षीप्रमाणे सामान्य मान्सून राहील असे सांगत जून ते सप्टेंबरमध्ये घेण्यात येणाºया तांदूळ, मका तसेच इतर पिके नेहमीप्रमाणे घेऊ शकता, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

स्कायमेटने देशात मान्सून ३० मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.

Monsoon arrives in Maharashtra from Harne in Konkan to Solapur

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात