VIDEO : अरे गधड्या तुझी लायकी आहे का सावरकरांबद्दल बोलायची? – राज ठाकरेंचा राहुल गांधींवर घणाघात!

Raj Thakray and Rahul Gandhi new

‘’हल्ली राहुल गांधी बोलतो की त्याच्या मागून…’’असा टोलाही लगावला आहे.

विशेष प्रतिनिधी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे नेहमीच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह, अपमानास्पद बोलल्याचे दिसून आले आहेत. वारंवार त्यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाहीरपणे अपमानास्पद उल्लेख केला गेला आहे. नुकतेच त्यांनी एका पत्रकारपरिषदेतही सावरकरांचा उल्लेख केला. शिवाय, काँग्रेसनेही सावरकरांबाबत ट्वीट केलेले आहे. यावरून भाजपासह अनेक हिंदुत्ववादी संघटना, सावरकरप्रेमींनी राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिक घेतली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे मित्र पक्ष असणारे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही यावर नाराजी व्यक्त केलेली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर राहुल गांधींवर घणाघात केला आहे. MNS president Raj Thackeray strongly criticized Rahul Gandhi for insulting Veer Savarkar

राज ठाकरे एका जाहीर कार्यक्रमात राहुल गांधींवर जोरदार टीका करतानाचा व्हिडीओ मनसेने आपल्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलरवरून ट्वीट केला आहे. ‘’देशभक्त, स्वदेशीचा पुरस्कर्ता, प्रखर क्रांतिकारक, विज्ञाननिष्ठ, तर्कसिद्ध हिंदुत्वाचा भाष्यकार, थोर संघटक, आग्रही समाजसुधारक, स्फूर्तिदायक ग्रंथ लिहिणारा इतिहासकार, नवनवीन शब्द देणारा भाषाशास्त्रज्ञ, द्रष्टा राजकारणी, ओजस्वी वक्ता, प्रतिभाशाली साहित्यिक आणि आपले संपूर्ण जीवन केवळ देश, मातृभूमीसाठी झोकून देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो.’’ असं या व्हिडीओसोबत मनसेने ट्वीट केलं आहे.

या व्हिडओमध्ये राज ठाकरे म्हणतात, ‘’फक्त महापुरुषांची बदनामी करणं, त्यादिवशी तो म्हैसूर सँडल सोप आला होता ना महाराष्ट्रात राहुल गांधी. गुळगुळीत मेंदूचा आहे. हल्ली राहुल गांधी बोलतो की त्याच्या मागून आर.डी.बर्मन बोलतो तेच कळत नाही. काय बोलतोय ते ऐकू तर येऊ दे. अरे गधड्या तुझी लायकी आहे का सावरकरांबद्दल बोलायची? माहिती तरी आहे का कुठे ठेवलं होतं, काय करत होते, काय हालआपेष्टा सहन केल्या? म्हणे सावरकरांनी माफी मागितली.’’


इथे तथाकथित वाघांचा तर तिजोरीवर डल्ला! – आशिष शेलारांचा ठाकरे गटावर निशाणा!


याशिवाय, ‘’दयेचा अर्ज एक स्ट्रॅटेजी नावाची गोष्ट असते, त्याचा आम्ही कधीच विचार नाही करणार. आम्ही काय बघणार, अरे बघितलं दयेचा अर्ज केला. अहो ‘सर सलामत तो पगडी पच्चास’ ना? ५० वर्षांची शिक्षा झालेला एक माणूस आतमध्ये सडत बसण्यापेक्षा त्यांच्याशी खोटं बोलून मी बाहेर तरी येतो आणि बाहेर आल्यानंतर मी पुन्हा हंगामा करतो, हे डोक्यात ज्याच्या सतत चालू असेल त्याला स्ट्रॅटेजी म्हणतात.’’ असंही राज ठाकरे सांगताना दिसतात.

याचबरोबर ‘’आमची कृष्ण नीती अजून आम्हाला काय सांगते? एखादी चांगली गोष्ट जर घडणार असेल आणि ती घडवण्यासाठी जर खोटं बोलायला लागलं तर खोटं बोला पण ती गोष्ट होणं गरजेचं आहे.’’ असंदेखील राज ठाकरेंनी म्हटल्याचं व्हिडीओत दिसून आलं आहे.

MNS president Raj Thackeray strongly criticized Rahul Gandhi for insulting Veer Savarkar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात