विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ठाकरे घराण्यातील तिसऱ्या पिढीतील आणखी एक सदस्य निवडणुकीच्या राजकारणात उतरणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कोथरूड मध्ये चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात पुन्हा एकदा किशोर शिंदे लढणार आहेत. खडकवासल्यात माजी आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
वरळीतून संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळाली आहेत तर हडपसर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना उमेदवारी मिळाली आहे. तर खडकवासला विधानसभा मतदारसंघातून मनसेचे सोनेरी आमदार स्व. रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश रमेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
इतर उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे : कल्याण ग्रामीण – प्रमोद (राजू) रतन पाटील, भांडुप पश्चिम : शिरीष गुणवंत सावंत, ठाणे शहर –
अविनाश जाधव, मुरबाड – संगिता चेंदवणकर, मागाठाणे – नयन प्रदीप कदम, बोरीवली – कुणाल माईणकर, दहिसर – राजेश येरुणकर, दिंडोशी – भास्कर परब, वर्सोवा – संदेश देसाई, कांदिवली पूर्व – महेश फरकासे, गोरेगांव – विरेंद्र जाधव, चारकोप – दिनेश साळवी, घाटकोपर पूर्व – संदीप कुलथे जोगेश्वरी पूर्व – भालचंद्र अंबुरे, विक्रोळी – विश्वजित ढोलम, घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App