राज ठाकरे यांची भेट चंद्रकांत दादांच्या वैयक्तिक राजकीय पथ्यावर?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या आजच्या कृष्णकुंजमधील भेटीवर माध्यमांनी बरीच चर्चा केली आहे. पण ही चर्चा मुंबई महापालिका निवडणुकीत युतीपुरती जास्त रंगविली आहे. MNS chief Raj Thackeray may give an edge to chandrakant patil in pune and kothrud

प्रत्यक्षात कदाचित मुंबई महापालिकेसाठी अधिकृतरित्या भाजप आणि मनसे एकत्र येणारही नाहीत. परंतु राज ठाकरे यांची भेट चंद्रकांतदादा पाटील यांना पुणे महापालिका आणि त्यांचा कोथरूड विधानसभा मतदारसंघ याच्यात मात्र होण्याची उपयोग होण्याची दाट शक्यता वाटते.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचा सामना थेट राष्ट्रवादीशी आहे. तिथे दोन दादांमध्ये एक प्रकारे सामना रंगेल. अजितदादा पवार आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्यातला हा सामना असेल. भाजपची पुण्यातली ताकद सध्या वाढलेली असली तरी पुणे महापालिकेवर दहा वर्षे राष्ट्रवादीने वर्चस्व गाजवले होते. राष्ट्रवादीतून फूट पडूनच भाजपची सध्याची ताकद वाढलेली दिसते आहे. शिवाय शिवसेनेशी असलेली युती भाजपच्या काही ठिकाणी पथ्यावर पडत असे. विशेषतः कोथरूड आणि हडपसर या दोन विधानसभेच्या मतदार संघात या तिचा प्रभाव पडत असे.



परंतु आता शिवसेनेशी पूर्ण फारकत झाल्यामुळे भाजपला एका पुरवणी ताकदीची जरूरत आहे. ती ताकद कदाचित मनसे पुरवू शकते. मनसेने कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा यांच्याविरुद्ध उमेदवार उभा केला होता. त्याने चांगली मते घेतली होती. चंद्रकांत दादा एक प्रकारे काठावर पास झाल्यासारखे कोथरूडमधून निवडून आले होते. राज ठाकरे यांच्या भेटीतून आपला मतदारसंघ “सेफ” करून घेणे हा देखील भेटी मागचा उद्देश असू शकतो.

त्याच बरोबर अन्य महापालिकांमध्ये देखील मनसेचा “पुरवणी ताकद” म्हणून भाजपला उपयोग होऊ शकतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. काँग्रेसने स्वतंत्र पाट लावला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मते पोखरणे मनसेसारख्या पक्षाच्या निमित्ताने किंवा त्या पक्षाला हाताशी धरून भाजपला शक्य आहे. या दृष्टीने विचार करून चंद्रकांतदादांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असू शकते.

अर्थात मनसे आणि भाजप यांना उघडपणे युती करण्यापेक्षा छुपी युती कितपत उपयोगी ठरू शकते याचीही चाचपणी राज ठाकरे आणि चंद्रकांतदादा यांच्या बैठकीत झाली असण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील उद्यापासून दिल्ली दौऱ्यावर जात असल्याच्या बातम्या आहेत. तेथे काही राजकारण अशी असते का त्यात मनसेला नेमके काय स्थान असू शकेल हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.

MNS chief Raj Thackeray may give an edge to chandrakant patil in pune and kothrud

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात