वृत्तसंस्था
कोल्हापूर : शिवसेनेचे कार्यकर्ते परब यांच्यावरील जीवघेण्या हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांना वैद्यकीय उपचारासाठी सोमवारी सायंकाळी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. MLA Nitesh Rane for medical treatment Admitted to Kolhapur Hospital
नितेश यांनी छातीत दुखत सल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्यांना कोल्हापुरात हलविले आहे. यावेळी समर्थकांसह पोलिसांची गर्दी केली होती. आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे काल सकाळी त्यांच्या छातीत दुखणे वाढल्याची तक्रार केली. त्यानुसार त्यांना वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्याचा निर्णय झाला.
त्यानुसार पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता त्यांना रुग्णालयात दाखल केले.यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रुग्णवाहिकेतून उतरल्यानंतर आमदार राणे थेट प्राथमिक उपचार केंद्र येथे दाखल झाले.याठिकाणी डॉक्टरांचा मोठा ताफा उपस्थित होता. राणे यांच्या प्रकृतीची तपासणी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App