संपकरी एसटी कामगार विलीनीकरणासाठी आग्रही; कामगार गुणरत्न सदावर्ते यांच्या पाठीशी!!


प्रतिनिधी

मुंबई : मागच्या तीन महिन्यांपासून सुरु असलेले एसटी कर्मचा-यांचे आंदोलन अद्याप संपलेले नाही. राज्य सरकारनेही या आंदोलन करणा-या एसटी कर्मचा-यांना सहानुभूती दाखवलेली नाही. संपकरी एसटी कर्मचारी विलीनीकरणाबाबत ठाम असून, आपण यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते यांना पाठिंबा देणार असल्याचे, या संपकरी कर्मचा-यांनी स्पष्ट केले आहे. एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण होईलच, असा ठाम विश्वास संपकरी कर्माचा-यांनी व्यक्त केला आहे. Sampakari ST workers insist on merger; With the support of Kamgar Gunaratna Sadavarte !!



मुंबई हायकोर्टाने एसटी कर्मचा-यांच्या मागण्या लक्षात घेता, विलीनीकरणाबाबत उच्चस्तरीय समितीची स्थापना करुन अहवाल 12 आठवड्यात सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ही मुदत आता संपली आहे. त्यामुळे संपकरी आता अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. अहवाल काहीही असला, तरीही संपकरी मात्र एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण होईलच, असा विश्वास व्यक्त करत आहेत. संपक-यांच्या मागण्यांबाबत सदावर्ते सुरुवातीपासून कायदेशीर मार्गाने लढा देत आहेत. समितीचा अहवाल काहीही आला, तरी कायदेशीर मार्गाने सदावर्ते एसटी कर्माचा-यांना विलीनीकरण मिळवून देणार आहेत. त्यामुळे शासनाच्या अहवालातील शिफारशींची पर्वा नसल्याची प्रतिक्रिया संपक-यांच्या शिष्टमंडळातील सदस्या सविता पवार यांनी व्यक्त केली.

2019 भरतीतील कामगारही सामील

एसटी महामंडळात 2019 मध्ये दुष्काळग्रस्त भागासाठी काढण्यात आलेल्या, भरतीतील 2 हजार 600 प्रशिक्षित चालक-वाहक उमेदवारही आता रस्त्यावर उतरले आहेत. या कर्मचा-यांना तीन वर्षांपासून नियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी भेट झाल्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा इशारा या उमेदवारांनी दिला आहे.

Sampakari ST workers insist on merger; With the support of Kamgar Gunaratna Sadavarte !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात