Minister Dattatray Bharane : महानगरपालिकेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियाना’अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. गटनेता आनंद चंदनशिवे यांनी कार्यक्रमादरम्यान भरणेंना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तेव्हा आपल्या भाषणादरम्यान मंत्री भरणे यांनी मुख्यमंत्री मरू द्या, पण आशीर्वाद माझ्या अजितदादांना द्या, असे वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. Minister Dattatray Bharane Controversial Statement on CM Thackeray in Solapur
विशेष प्रतिनिधी
सोलापूर : महानगरपालिकेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियाना’अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. गटनेता आनंद चंदनशिवे यांनी कार्यक्रमादरम्यान भरणेंना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तेव्हा आपल्या भाषणादरम्यान मंत्री भरणे यांनी मुख्यमंत्री मरू द्या, पण आशीर्वाद माझ्या अजितदादांना द्या, असे वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वास्तविक सोलापूर महापालिकेच्या वृक्ष लागवडीचे कार्यक्रमात पालकमंत्री दत्तात्रण भरणे यांनी हजेरी लावली होती. या वृक्ष लागवड मोहिमेतून प्रभाग क्रमांक पाच मधील देगाव रोड येथे 43 एकर जागेवर गटनेता आनंद चंदनशिवे यांच्या भांडवली निधीतून वीस हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमात आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांचे भरभरून कौतुक केले. यावेळी चंदनशिवे यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हा असे म्हणत त्यांचं कौतुक केले. त्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी चंदनशिवे यांना “दादा मला खूप काही मिळाले आहे. तुम्हाला काय द्यायचं आशीर्वाद तो माझ्या अजितदादांना द्या, असे म्हणत महापौरांशी बोलताना थेट मुख्यमंत्री मरू द्या, असे वादग्रस्त वक्तव्य केले.
दरम्यान, पालकमंत्री भरणे यांनी याप्रकरणी आता दिलगिरीही व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांविषयी विधान अनावधानाने झाले. त्याचा विपर्यास करू नये, असे म्हणत मंत्री भरणे यांनी दिलगिरी व्यक्त करत असल्याचा व्हिडियो व्हायरल केला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या माझी वसुंधरा अभियान कार्यक्रमातच पालकमंत्री भरणे यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने उपस्थित पत्रकारांसह सर्व प्रशासनातील अधिकारी आवाक झाले होते.
Minister Dattatray Bharane Controversial Statement on CM Thackeray in Solapur
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App