चीनवरची निर्भरता वाढली तर चीनपुढे झुकावे लागेल, स्वदेशीचा नवा अर्थ सांगताना सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचा इशारा


वृत्तसंस्था

मुंबई : चीनवर बहिष्कार घालण्याच्या बाता आपण खूप करतो. परंतु आपण इंटरनेट, वापरतो मोबाईल वापरतो. त्याचे तंत्रज्ञान कुठून येते? ते बाहेरून येते. चीनकडून येते. आपल्याकडे ते तंत्रज्ञान विकसित झालेले नाही. त्यामुळे चीनवर आपण अधिक निर्भर राहिलो तर आपल्याला चीनपुढे झुकावे लागेल, असा गंभीर इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज दिला. We might speak on China&call for boycott but where does everything on your mobile come from?

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात ते मुंबईत बोलत होते. डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी स्वदेशीचा नवा अर्थही समजावून सांगितला. स्वदेशी म्हणजे फक्त आपल्याच देशातल्या वस्तू वापरणे असे नाही, तर आंतरराष्ट्रीय व्यापार राहीलच. तो वाढेलच पण तो आपण आपल्या अटींवर केला पाहिजे. कोणाच्या दबावाखाली न येता आपल्या मर्जीने व्यापार केला पाहिजे. याचा अर्थ स्वदेशी आहे, असे ते म्हणाले. स्वदेशी म्हणजे स्व निर्भरता आणि अहिंसा अशी नवी व्याख्या त्यांनी केली.

चीनवरील बहिष्काराबाबत डॉ. मोहन भागवत म्हणाले, की चिनी वस्तूंवर आपण बहिष्काराच्या बाता खूप मारतो. परंतु आपल्याकडच्या इंटरनेटने, मोबाईलमधले तंत्रज्ञान बाहेरूनच येते. आपल्याकडे ते तंत्रज्ञान उपलब्ध नाही. आपण चीनवर जर आधिक निर्भर राहिलो तर आपल्याला त्या देशाकडे झुकावे लागेल. आत्मिक सुरक्षेवरच सगळ्या सुरक्षा अवलंबून आहेत हे विसरून चालणार नाही. आपण आपले तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे. सुरुवात छोटी असेल. पण नंतर त्याच्यामध्ये सातत्य टिकवून कष्ट करून प्रयत्नपूर्वक आपले तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे.

स्वदेशी म्हणजे इतर देशांत पासून तुटणे नाही. आंतरराष्ट्रीय व्यापार आपल्या मर्जीने आणि आपल्या अटींवर करणे म्हणजे स्वदेशी. स्वदेशी तत्त्वज्ञान आत्मसात केल्यामुळे आपल्या देशातला रोजगार वाढेल. युवकांच्या हाताला काम मिळेल. अन्यथा आपल्याकडून रोजगार जाईल. हिंसा वाढेल. त्यामुळे स्वदेशीचा अर्थ स्व निर्भरता, युवकांना रोजगार आणि अहिंसा असाही होतो याकडे डॉ. मोहन भागवत यांनी लक्ष वेधले आहे.

We might speak on China&call for boycott but where does everything on your mobile come from?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात