विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : -महाराष्ट्रातील पहिले मिनी तारांगण रत्नागिरी शहरात उभारले जात असून त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. UK वरून येणाऱ्या मशनरी पुढील दहा दिवसाचा रत्नागिरी येथे दाखल होतील व एप्रिल अखेरपर्यंत तारांगण हे सर्वांसाठी उपलब्ध होईल,अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. Mini galaxy in Ratnagiri opens at end of April; People can see; Art Gallery, Museum too
उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी मिनी तारांगण कामास्थळी जाऊन कामाची पाहणी केली त्यावेळी बोलताना त्यानी हि माहिती दिली. तसेच कोरोना मुळे तारांगणाचे काम संथ गतीने चालू होते. त्याचप्रमाणे राज्यातील पहिले दर्जेदार मिनी तारांगण म्हणून याकडे पाहिले जाईल आवश्यक आधुनिक मशिनरी परदेशातून मागवली गेली आहे.
तसेच या प्रकारची मशिनरी अन्य कोठेच नाही.याचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थ्यांना व्हावा असा हेतू आहे.तसेच आर्ट गॅलरी, म्युझिअम देखील येथे तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App