विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी परीक्षा घेण्यात येणार होती. काही तांत्रिक अडचणीचे कारण देत ही परीक्षा अचानक रद्द करण्यात आली. ही परीक्षा रद्द झाल्याची घोषणा रात्री उशीरा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका व्हिडिओद्वारे दिली. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना होणार्या त्रासाबद्दल त्यांनी या वेळी माफीदेखील मागितली. मात्र अचानक परीक्षा रद्द करण्यात आली आणि रात्री उशीरा याची माहिती देण्यात आली यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
MHADA exams were canceled late last night, former chief minister Devendra Fadnavis criticized the state government
याच प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, आरोग्य भरतीच्या परीक्षेचा घोळ..पेपरफुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत… आता म्हाडा परीक्षेतही तेच घोळ…मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ….सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही… भ्रष्टाचार अनास्था आणि निर्लज्जतेचे कळस… अशा शब्दांमध्ये त्यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
आरोग्य भरती परीक्षेचा घोळ!पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ! सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही! भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) December 12, 2021
आरोग्य भरती परीक्षेचा घोळ!पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत
आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ!
सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही!
भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस!
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) December 12, 2021
Mhada Exam Update : म्हाडाची पूर्ण आठवड्यात होणारी परीक्षा पुढे ढकलली ;आता या महिन्यात होणार परिक्षा
मागील जवळपास दोन अडीच वर्षांपासून राज्यातील विविध परीक्षांचे आयोजन गोंधळलेले दिसत आहे. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे नुकसान देखील झालेले आहे. राज्य शासनाच्या भरती परीक्षा असोत किंवा मेडिकल एण्ट्रन्स असू दे किंवा म्हाडाच्या परीक्षा असू दे, बऱ्याच परीक्षांचे नियोजन पूर्णपणे गंडलेले आहे.
आणि यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, असे किती दिवस आणि किती वेळा सहन करायचे? राज्य सरकारचा नोकरी देऊ शकत नसेल, तर त्यांची थट्टा देखील करु नका. दोषींवर कठोर कारवाई करा. सरकार म्हणून कुणी जबाबदारी घेणार नाही का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. आणि या सर्व गोष्टी सांभाळण्यासाठी राज्यात यंत्रणा कार्यान्वित कधी होणार? हा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विचारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App