वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रात १४ ऑगस्टपर्यंतच प्रशासकीय बदल्यांना राज्य सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेऊन राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. MHA government take important decision on administrative transfer amid corona third wave
सरकारने आदेशात म्हटलं आहे, “सद्यस्थितीत महाराष्ट्र हे कोरोनाबाधित राज्य आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता लक्षात घेता बदली भत्त्यावरील खर्च मर्यादित करण्यात येत आहे. सर्वसाधारण बदल्या या एकूण कार्यरत पदांच्या १५ टक्के एवढ्या मर्यादेत बदली अधिनियमातील कलम ६ अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने कराव्यात.
ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संबंधित पदावर कार्यकाळ पूर्ण झाला आहे अशाच बदल्या कराव्यात. या बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण करावी. यानंतर जी पदं रिक्त राहतील त्या पदांवर विशेष कारणास्तव बदल्या करण्यास १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या काळात परवानगी असेल.”
एकूण पदांच्या १० टक्के बदल्यांना परवानगी
विशेष कारणास्तव होणाऱ्या बदल्या या एकूण कार्यरत पदांच्या १० टक्केच करता येणार आहेत. या सर्वसाधारण बदल्या आणि विशेष कारणास्तव बदल्या करताना नागरी सेवा मंडळाच्या शिफारसी आणि बदली अधिनियमातील तरतुदींचं पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
ज्या विभागांमध्ये बदलीसाठी संपूर्ण किंवा अंशतः ऑनलाई संगणकीय प्रणाली आहे त्यांनी त्याचा वापर करावा असंही या आदेशात नमूद आहे. याशिवाय कर्चमारी आणि अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी निश्चित केलेल्या दिवशीच हजर रहावे अनथा ते दिवस गैरहजेरी गृहित धरण्यात येईल, असंही स्पष्ट करण्यात आलंय.
हत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App