कडकनाथ कोंबडीने वाढते रोग प्रतिकारक शक्ती, कडकनाथ रिसर्च सेंटरचा अजब दावा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक तरुणांना कडकनाथ कोंबडीच्या प्रकल्पाने देशोधडीला लावले. मात्र, कडकनाथ कोंबडीने कोरोना विरोधात रोगप्रतिकारक शक्ती वाढते असा दावा मध्य प्रदेशातील झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषि विज्ञान केंद्राने केला आहे.  Kadaknath Chicken boosts immunity, a strange claim by Kadaknath Research Center

इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्चला एक पत्र पाठवण्यात आलं आहे. कडकनाथ कोंबड्यांच्या मांसातून प्रोटीन, विटामिन, झिंक आणि लो फॅट मिळतात. ते कोलेस्ट्रॉल फ्री असते. त्यामुळे करोना झाल्यानंतर आणि त्यातून बरे झाल्यानंतर आहारात कडकनाथ कोंबडीचा वापर करायला हवे.

पत्रावर नॅशनल मीट रिसर्च सेंटर आणि मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आलेला अहवालच्या प्रतीही जोडण्यात आल्या आहेत. ट्विटरवरही सूचना पत्र दिलं गेलं आहे. त्याचबरोबर दोन्ही संस्थांना पत्र आणि अन्य दस्ताऐवज पाठवण्यात आले आहेत.



कोंबडीच्या अंड्यांमधूनही प्रोटीन मिळत असल्याचे म्हटले आहे. करोना रुग्णांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी होत असल्यांचं दिसून आलं आहे. त्यासाठी हाय प्रोटीन आहार महत्त्वाचा असते. त्यामुळे कडकनाथ कोंबडी त्याला योग्य पर्याय ठरेल असं सांगण्यात येत आहे. आता आयसीएमआर यावर काय लक्ष आहे.

अजूनपर्यंत यावर कोणतही परीक्षण केलेलं नाही. त्यामुळे कडकनाथ कोंबड्यांचा आहारात समावेश करायचा की नाही? यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. हैदराबाद नॅशनल मीट रिसर्च लॅबोरेटरीने कडकनाथ कोंबड्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट नसल्याचा दावा केला आहे.

Kadaknath Chicken boosts immunity, a strange claim by Kadaknath Research Center

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात