जर्मनीतील ‘बुंदेसलिगा’ या सर्वात मोठ्या व्यावसायिक फुटबॉल लीग सोबत केला सामंजस्य करार
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि जर्मनी येथील ‘बुंदेसलिगा’ या सर्वात मोठ्या व्यावसायिक फुटबॉल लीग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा करार झाला. Memorandum of Understanding between the Government of Maharashtra and Germanys largest professional football league Bundesliga
शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुहास दिवसे, तर ‘बुंदेसलिगा’ चे प्रतिनिधी ज्युलिया फार, पीटर लीबल, कौशिक मौलिक यांच्यात कराराचे आदानप्रदान करण्यात आले.
याशिवाय ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी हा दिवस महाराष्ट्राचा ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी, महाराष्ट्र खेळाला प्रोत्साहन देणारे देशतील अग्रेसर राज्य आहे. त्यामुळे खेळात महाराष्ट्राने घवघवीत यश मिळवले आहे. चौथ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत ५६ सुवर्ण पदकांसह एकूण १६१ पदके मिळवून तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ३९ पदकांसह १४० पदके मिळवून महाराष्ट्राने अव्वल कामगिरी केली आहे. असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धेतही आपल्या खेळाडूंनी यश मिळवले. ऑलिम्पिकमध्येही चांगले यश मिळावे यासाठी सर्व सहकार्य करू. खेळाडूंनी राज्याचा लौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर असाच उंचवावा, असे आवाहन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App