प्रतिनिधी
मुंबई : गेले 14 दिवस एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. ठाकरे – पवार सरकारचे परिवहन मंत्री अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी नुसत्या बैठकांवर बैठका घेत आहेत. आज ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याबरोबर त्यांची बैठक झाली, पण या सर्व बैठकांमधून एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीवर “तोडग्याचे जोर” कुणालाच काढता आले नाहीत.Meetings on ST strikes
– संप सुरू राहील
याच मुद्द्यावरून भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीचा ठाकरे पवार सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्य सरकार तोडगा काढत नाही. केवळ बैठका सुरू आहेत. शरद पवारांना अनिल परब भेटतात, ते राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांशी चर्चा करतात, आता शरद पवार आणि मंत्री अनिल परब पुन्हा भेटतात. अशा प्रकारे बैठकांचे सत्र सुरू आहे, पण निर्णय होत नाही. त्यामुळे यावर अंतिम निर्णय घ्या. जोवर एसटीचे विलीनीकरण होत नाही, तोवर संप सुरूच राहणार आहे, अशी भूमिका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडली.
…तर ST कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल ; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
भाजपाने एसटी कामगारांना नादाला लावले म्हणता, ते काय लहान मुले आहेत का? त्यांना त्यांचे भले कशात आहे, हे समजते. आजवर ज्या कामगार संघटनांच्या भरवशावर कामगार राहिले, त्यांनी त्यांची फसवणूक केली, त्यामुळे त्यांनी आता सगळ्या कामगार संघटनांचा नाद सोडला आहे, असे पडळकर म्हणाले.
आम्ही आजही चर्चेवरच विश्वास ठेवतो. चर्चेतूनच तोडगा निघू शकतो. पण त्यासाठी सरकारने ठोस भूमिका घेऊन चर्चेला यावे, सरकार तसे करत नाही, उलट कामगारांशी चर्चेचे नाटक करते. त्यांची भूमिका सरकार जाणून घेते आणि त्यावर दुसरी रणनीती ठरवते, असे टीकास्त्र देखील पडळकर यांनी सोडले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App