THANK YOU BJP : विधानपरिषदेसाठी प्रज्ञा सातव बिनविरोध; भाजपने मान्य केली कॉंग्रेसची विनंती;नाना पटोलेंनी मानले भाजपचे आभार

  • भाजप उमेदवार संजय केनेकर यांनी अर्ज मागे घेतल्याने प्रज्ञा सातव यांची बिनविरोध झाली.

  • ही पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे आभार मानले.

विशेष प्रतिनिधी

मुंबई: डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे .आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली . ही निवड बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती .याला मान देत भाजपनं आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला .यासाठी नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे आभार मानले आहेत.NANA PATOLE SAID THANK YOU BJP

महाविकास आघाडीने सातव यांना पाठिंबा दिला होता, भाजपा उमेदवार संजय केनेकर यांनी अर्ज मागे घेतल्याने सातव यांची बिनविरोध झाली.

निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना प्रज्ञा सातव यांना प्रमाणपत्र देताना विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. या मान्यवरांनी विजयी उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं होतं. त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपद देवून पक्षाने मोठी जबाबदारी दिली होती. त्यानंतर त्या हिंगोली कळमनुरीत सक्रिय झाल्या होत्या.

महिलांच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून ते मतदारसंघातील कामांबाबतचा आढावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली होती. मधल्या काळात त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची भेट घेऊन चर्चाही केली होती.

 

NANA PATOLE SAID THANK YOU BJP