लांगूलचालनाचे राजकारण करणाऱ्यांना सावरकरांच्या विचारांची भीती, चंद्रकांत पाटील यांची टीका


सावरकरांनी मांडलेले विचार तरुण पीढीला भावतील या भीतीने लांगूलचालनाचे राजकारण करणाऱ्यांनी त्याला विरोध सुरू केला असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.Fear of Savarkar’s thoughts to those who do tailgating politicis Chandrakant Patils criticism


विशेष प्रतिनिधी

पुणे – सावरकरांनी मांडलेले विचार तरुण पीढीला भावतील या भीतीने लांगूलचालनाचे राजकारण करणाऱ्यांनी त्याला विरोध सुरू केला असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

‘मी सावरकर मंच’ आणि ‘हिंदवी स्वराज्य महासंघा’च्या वतीने केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या ‘वीर सावरकर : द मॅन हू कुड हॅव्ह प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘ज्या वेगाने सावरकरांनी मांडलेले विचार पुन्हा एकदा समोर येऊ लागले, त्या वेगाने त्यांना विरोध सुरू झाला आहे.


मुंबईत शिवशाहिरांच्या संशोधन – साहित्याचे कलादालन उभारा; भाजपाची मागणी


सावरकरांचे विचार तरुणांना पटतील, त्याबाबत तरुण आग्रही होतील, राज्यकर्त्यांना जाब विचारु लागगतील ही विरोध करणार्यांना भीती आहे. मात्र आजची पीढी भरपूर वाचन करते, भावनिक विषयांवर नाही तर तथ्यांच्या आधारे आपली मते बनविते त्यामुळे त्यातूनच सावरकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. ‘

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आत्मसात केले असते तर फाळणी टाळता आली असती असे मत धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. घटनेतील ३७० कलम हटविल्याने आणि राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाल्याने सावरकर युगाचा उदय होत आहे, असे त्यांनी सांगितले.

सावरकरांचा राष्ट्रीय सुरक्षेच्या विचाराची अंमलबजावणी करणे आवश्यक होते, असे मत माहूरकर यांनी व्यक्त केले. नवीन पीढीच्या विझून गेलेल्या चेतना प्रज्वलित करण्यासाठी चेतविण्याचे काम सावरकर नावाने केले आहे. त्यांचे साहित्य वाचल्यानंतर तुम्ही तटस्थ राहू शकत नाही, त्यांचे भक्तच व्हाल असे पंडित यांनी मत मांडले.

Fear of Savarkar’s thoughts to those who do tailgating politicis Chandrakant Patils criticism

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात