विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे चार दिवस उरले असताना मराठा + मुस्लिम कॉम्बिनेशन करून Vote Jihad करायचा मामला संपूर्ण देशात तापला असून मौलाना सज्जाद नोमानी यांनी एक व्हिडिओ जारी करून मुसलमानांना महाराष्ट्रात उघडपणे व्होट जिहाद करायची चिथावणी दिली आहे.
इतकेच नाही तर शरद पवार हे महाराष्ट्रातल्या व्होट जिहादचे “सिपेसालार” म्हणजे सरदार असून उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि नाना पटोले हे त्या व्होट जिहादचे “शिपाई” आहेत, अशी मुक्ताफळं देखील मौलाना सज्जाद नोमानी यांनी उधळली आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप महायुतीला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीला व्होट जिहाद करून सर्व मुसलमानांनी मतदान करायचे, असे आवाहन मौलाना सज्जाद नोमानी यांनी केले आहे. केवळ महाराष्ट्रात भाजपला पराभूत करायचा आपला उद्देश नसून केंद्रातले मोदी सरकार देखील जास्त काळ टिकता कामा नये, हा आपला मुख्य उद्देश असल्याचे सज्जाद नोमानी यांनी त्या व्हिडिओमध्ये नमूद केले.
Devendra Fadnavis attack देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; मतांसाठी मविआचे नेते उलेमाचे तळवे चाटत आहेत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौलाना सज्जाद नोमानींचा संबंधित व्हिडिओ जाहीर सभेत ऐकवल्यानंतर शरद पवार संतापले. त्यांनी देखील दुसऱ्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीसांना झापले. तशा बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या व्होट जिहाद हा शब्द मुसलमानांनी काढला नसून स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच पहिल्यांदा काढला असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. मात्र सज्जाद नोमानींनी थेट शरद पवारांना व्होट जिहादचे सिपेसालार म्हटले, त्याबद्दल त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.
एक ऐसा व्होट जिहाद करो…जिसके सिपेसालार है : शरद पवारअझीम सिफाही है : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटौलेऔर हमारा निशाना महाराष्ट्र नही…तो दिल्ली…ही मुक्ताफळे आहेत, ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांची…2 तासांपूर्वी त्यांच्या अधिकृत युट्युब हँडलवर हा… pic.twitter.com/thp2d2ZSVZ — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 15, 2024
एक ऐसा व्होट जिहाद करो…जिसके सिपेसालार है : शरद पवारअझीम सिफाही है : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटौलेऔर हमारा निशाना महाराष्ट्र नही…तो दिल्ली…ही मुक्ताफळे आहेत, ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांची…2 तासांपूर्वी त्यांच्या अधिकृत युट्युब हँडलवर हा… pic.twitter.com/thp2d2ZSVZ
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 15, 2024
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सज्जाद नोमानी यांचा तो व्हिडिओ शेअर करून महाविकास आघाडीला बटेंगे तो कटेंग चालत नाही, पण व्होट जिहाद चालते, असा टोला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांना हाणला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App