विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत “व्होट जिहाद” करून मुसलमानांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन केले. भारतीय समाजात तेढ निर्माण करून फूट पाडणारे हे भाषण असून त्या संदर्भात निवडणूक आयोगाने त्या भाषणाची चौकशी आणि तपास सुरू केला आहे. सायंकाळपर्यंत त्या संदर्भातला रिपोर्ट येणे अपेक्षित आहे. Maulana Sajjad Nomani’s Vote Jihad speech Examination ECI
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय नागरिकांना सामाजिक तेढ निर्माण करून समाजात फूट पाडून मते मागण्याचा कुठलाही अधिकार नाही. भारतीय राज्यघटना आणि निवडणूक अधिनियम यासंदर्भात कठोरपणे कायद्याची अंमलबजावणी करायला सांगतात. समाजामध्ये धर्म, पंथ, जाती आणि लिंग भेद करून त्यावर आधारित प्रचार करून मते मागण्याचा अधिकार नाही. तसे कोणी केल्यास संबंधित उमेदवार अथवा पक्ष अथवा नागरिक याचा निवडणूक आणि मतदानाचा अधिकार काढून घेतला जाऊ शकतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जाहीर आवाहन करून मतदान मागितले होते. मात्र, त्यावेळी निवडणूक अधिनियमाचा आधार घेऊन त्यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला होता.
मौलाना सज्जाद नोमानी यांनी आपल्या भाषणातून “व्होट जिहाद” हा शब्द वापरून महाविकास विकास आघाडीला पाठिंबा दिला. शरद पवारांना ते व्होट जिहादचे “सिपेसालार” म्हणाले. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींना व्होट जिहादचे “शिपाई” म्हणाले. जर मुस्लिमांनी भाजप महायुतीला मतदान केले, तर त्यांच्यावर बहिष्कार घालायची चिथावणी दिली. भाजपला मतदान करणाऱ्या मुसलमानांचे हुक्का पाणी बंद करायची भाषा वापरली.
निवडणूक आयोगाने मौलाना सज्जाद नोमानी यांच्या भाषणाची तपासणी सुरू केली. त्याचा रिपोर्ट सायंकाळपर्यंत येण्याची अपेक्षा आहे. ही माहिती त्यांच्या भाषणाविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App