Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा आक्रमक; तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर

Harshvardhan Sapkal

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : Harshvardhan Sapkal कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त विधानचे पडसाद आता उमटण्यास सुरू झाले आहे. सपकाळ यांनी टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान केले होते. यावर आता मराठा ठोक मोर्चा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. मराठा ठोक मोर्चाचे सोलापूर येथील समन्वयक महेश डोंगरे यांनी हे बक्षीस जाहीर केले आहे.Harshvardhan Sapkal

सोलापूर येथील मराठा ठोक मोर्चाने हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलया आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्यामुळेच कॉंग्रेस संपली. त्यांच्या तोंडाला जो कोणी काळे फासेल त्याला एक लाखांचे बक्षीस देणार. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांना मराठा समाज रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा देखील महेश डोंगरे यांनी इशारा दिला आहे.Harshvardhan Sapkal



काय आहे प्रकरण?

मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता. यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला. त्यानंतर तो फोटो हटवण्यात देखील आता. मात्र, याच वादानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा येथे बोलताना वादग्रस्त विधान केले. टिपू सुलतान यांना देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान त्यांनी केले. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याच प्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केले, असे सपकाळ म्हणाले होते.

माझ्या वक्तव्याची मोडतोड- हर्षवर्धन सपकाळ

दरम्यान, वादग्रस्त विधान केल्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर ट्विट करत म्हटले की, माझ्या वक्तव्याची मोडतोड करून ‘ध’ चा ‘मा’ करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप सपकाळ यांनी केलया आहे.

Maratha Thoke Morcha Protests Harshvardhan Sapkal; Reward for Blackening Face

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात