प्रतिनिधी
बुलढाणा : मराठा आरक्षण महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या काळात गेले आणि आज समाजकंटक सामाजिक सलोखा बिघडवायचा प्रयत्न करत आहेत, पण तो आम्ही बिघडू देणार नाही, असा खणखणीत इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्यातल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाद्वारे दिला. Maratha reservation went during Thackeray-Pawar period
शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाचे आंदोलन आणि आरक्षण या विषयावर सविस्तर भूमिका मांडली.
मुख्यमंत्री म्हणाले :
आंदोलकांवर लाठीमार केल्या प्रकरणी जालन्यातील पोलीस अधीक्षकाला आम्ही सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. डीवायएसपीलाहा जिल्ह्यातून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत, अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) सक्सेना हे उद्याच जालना येथे येतील आणि दोषींना निलंबित केले जाईल, मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची वेळ पडल्यास न्यायालयीन चौकशीही केली जाईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more