भाजपाकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषित, उत्तर प्रदेशातून ‘या’ दिग्गज नेत्याला दिली उमेदवारी!


भाजपचे ज्येष्ठ नेते हरिद्वार दुबे यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशमधील राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हरिद्वार दुबे यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी  भाजपाने उमेदवार जाहीर केला आहेा. भाजपाने उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.  Dinesh Sharma declared candidature for Rajya Sabha seat from BJP

नुकतीच भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) पोटनिवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली होती आणि राज्यसभेसाठी पोटनिवडणूक घेण्याची घोषणा केली होती. उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने दिनेश शर्मा यांच्या नावाला मंजुरी दिली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते हरिद्वार दुबे यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशमधील राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे. भाजपाचे राज्यसभा खासदार हरिद्वार दुबे यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी २६ जून रोजी दिल्लीत निधन झाले. आग्रा येथील रहिवासी असलेल्या हरिद्वार दुबे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.

निवडणूक आयोगाच्या (ECI) अधिसूचनेनुसार, पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर आहे. 6 सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून 8 सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे.

Dinesh Sharma declared candidature for Rajya Sabha seat from BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात