विशेष प्रतिनिधी
मुंबई : खरे कोण??, खोटे कोण??; मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला अंतर्गतच राजकीय ग्रहण!!, अशी अवस्था आता मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर आली आहे. Maratha reservation issue fixed in internal fight within community leaders
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषण आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर झाली आहे, त्याचवेळी जिजाऊंचे खरे वंशज कोण?? आणि खोटे वंशज कोण??, याची लढाई मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये लागली आहे.
राजमाता जिजाऊंचे वंशज लेखक नामदेवराव जाधव मनोज जरांगे पाटलांचे समर्थक आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला शरद पवारांचीच छुपी चिथावणी असल्याचे बोलले जाते. पण नामदेवराव जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांना टार्गेट करताच शरद पवारांचे समर्थक नामदेवराव जाधव हेच जिजाऊंचे खोटे वंशज असल्याचे सिद्ध करायच्या मागे लागले आहेत.
नामदेव जाधव नावाची व्यक्ती सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज म्हणवून घेत आहे, मात्र त्यांचा राजे लखोजीराव जाधव आणि जिजाऊ माँ साहेब यांच्या घराण्याशी कोणताही संबंध नसून ती व्यक्ती केवळ प्रसिद्धीसाठी आदरणीय पवार साहेबांवर टीका करत आहे.… pic.twitter.com/qotv7MfWPP — Rohit Pawar (@RRPSpeaks) November 13, 2023
नामदेव जाधव नावाची व्यक्ती सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज म्हणवून घेत आहे, मात्र त्यांचा राजे लखोजीराव जाधव आणि जिजाऊ माँ साहेब यांच्या घराण्याशी कोणताही संबंध नसून ती व्यक्ती केवळ प्रसिद्धीसाठी आदरणीय पवार साहेबांवर टीका करत आहे.… pic.twitter.com/qotv7MfWPP
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 13, 2023
शरद पवारांच्या निवडणूक आयोग असल्या डॉक्युमेंट्स वर त्यांची जात ओबीसी आहे. त्यामुळे ते मराठा नेताच नाहीत. मराठा समाजाची त्यांनी गेली 50 वर्षे फसवणूक केली. शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी असल्याचा आरोप त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर शरद पवार समर्थकांनी नामदेवराव जाधव हे जिजाऊंचे वंशज नसल्यास आज “शोध” लावला. राजे लखूजी जाधवांचे प्रा. राजे गोपाल भगवानराव जाधव यांनी आमदार रोहित पवारांना पत्र लिहून नामदेवराव जाधव हे जिजाऊंचे खरे वंशज नसल्याचा दावा केला. रोहित पवारांनी राजे गोपाल भगवानराव जाधव यांचे पत्र व्हायरल करून या संपूर्ण प्रकाराच्या चौकशी आघाडी केली. तशी पोस्ट रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर लिहिली. नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांच्या मराठा जाती विषयी शंका घेताच, खुद्द नामदेवरावांच्याच वंशजत्वाविषयी शंका घेतली गेली.
त्याचवेळी दिवाळीनंतर बीड जिल्ह्यातला मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला. पण या सर्व लढ्यात खरे कोण?? आणि खोटे कोण??, याचेच राजकीय ग्रहण लागल्याचे दिसून आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App