Manoj Jarange : सरकारी प्रतिनिधींच्या भेटीविनाच मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; कार्यकर्त्यांनी रात्रीच लावले सलाईन!!

Manoj Jarange's hunger strike suspended without meeting the government representatives

विशेष प्रतिनिधी

जालना : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) त्यांनी आज अचानक आपले उपोषण स्थगित केले. काल रात्री त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे 40 – 50 कार्यकर्त्यांनी त्यांचे हात पाय दाबून धरले आणि त्यांना सलाईन लावले. त्यामुळे त्यांनी आज उपोषण स्थगित करण्याचा अचानक निर्णय घेतला. कुठल्याही सरकारी प्रतिनिधींच्या भेटीशिवाय मनोज जरांगे यांचे उपोषण आज थांबले. ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यासाठी जरांगे यांनी सरकारला आता 13 ऑगस्टची मुदत दिली आहे. पाटील हे १३ जुलैपासून उपोषणाला बसले होते. Manoj Jarange’s hunger strike suspended without meeting the government representatives

याआधी राज्य सरकारने मनोज जरांगेंकडे 2 महिन्याची मुदत मागितली होती. मात्र, मनोज जरांगे यांनी सरकारला 13 जून ते 13 जुलैपर्यंत एक महिन्याचा अवधी दिला होता. 13 जुलैपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न निकाली न काढल्यामुळे मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले. मात्र काल (मंगळवार, २३ जुलै) रात्री मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळली. परिणामी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीने सलाईन लावली. त्यामुळे मनोज जरांगे नाराज झाले.

सलाईन लावून बेगडी उपोषण मी करणार नाही, असं सांगत त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच त्यांनी सरकारला 13 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन दिली. जरांगे सरकारला म्हणाले, “तुम्हाला दोन महिने मुदत हवी होती, त्यानुसार मी 13 ऑगस्टर्यंतची मुदत देतो. तुम्ही म्हणाला होता त्याप्रमाणे दोन महिन्यात दिलेला शब्द पाळा.


Manoj Jarange : मनोज जरांगेंची स्वतःलाच मुदतवाढ; 288 पाडायचे की ठेवायचे??, 29 ऑगस्टला ठरवणार!!


 

मनोज जरांगे यांची काल रात्री तब्येत खराब झाली. रक्तातील साखरेचं प्रमाण 60 पर्यंत घसरले होते. मला माझे सगळे सहकारी समजावत होते की तुम्ही सलाईन लावून घ्या. मी त्यांना म्हटलं, मला लढू द्या, उपोषण करू द्या, परंतु ते म्हणाले, आम्हाला तुम्ही हवे आहात आणि आरक्षणही हवं आहे. तुम्ही नसाल तर आम्हाला काही मिळणार नाही. रात्री माझ्याबरोबर काय होत होतं ते कळत नव्हतं.

चार-पाच जणांनी माझे हात पाय धरले आणि सलाईन लावली. ही सगळी मंडळी या गोष्टी माझ्या मायेपोटी करत आहेत. ते मला म्हणतात, आम्हाला तुम्ही हवे आहात, आरक्षणही हवं आहे. तुम्ही राहिलात तर आरक्षण द्याल, तुम्ही मैदानात असाल तर आपल्या समाजाला न्याय मिळेल. म्हणून त्यांनी रात्री मला जबरदस्तीने सलाईन लावली, अशी माहिती स्वतः जरांगे यांनी दिली.

सरकारला १३ ऑगस्टपर्यंतची मुदत

जरांगे म्हणाले, मंत्री शंभूराज देसाई म्हणाले होते, आम्ही मनोज जरांगेंकडे 2 महिन्यांची मुदत मागितली होती. पण मी त्यांना 13 जून ते 13 जुलैपर्यंतचा अवधी दिला होता. त्यांना अजून एक महिना हवा होता. यावर मी विचार केला की इथे पडून राहिलो तरी त्यांना तो वेळ मिळणारच आहे. त्यापेक्षा मी आता ठरवलं आहे आता हे आंदोलन स्थगित करेन आणि सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ देईन. माझं आवाहन आहे, 13 ऑगस्टपर्यंत तुम्ही करून दाखवा, तुम्ही दोन महिने मागितले होते, 13 जून ते 13 ऑगस्टपर्यंतचे दोन महिने घ्या आणि मराठ्यांना आरक्षण देऊन तुम्ही दिलेला शब्द पाळा.

Manoj Jarange’s hunger strike suspended without meeting the government representatives

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात