Manoj Jarange : भावी मुख्यमंत्री : ठिणगीची आग लागली, महत्त्वाकांक्षा पोस्टर्स वर आली; अनेक भावींची खुर्ची डळमळली!!

Manoj Jarange

विशेष प्रतिनिधी

पुणे : आपण निवडणूक लढवणार नाही, इतरांना पाडणार, असे म्हणणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंच्या ठिणगीची आग लागली. त्यांची भावी मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा पोस्टरवर आली. पण त्यामुळे अनेक भावी मुख्यमंत्र्यांची खुर्ची डळमळली!! Manoj Jarange patil fututre chief minister

मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातल्या पुण्याच्या सभेत त्यांची “भावी मु ख्यमंत्री” म्हणून पोस्टर्स झळकली. जरांगे समर्थकांनी ती झळकावली. आत्तापर्यंत मनोज जरांगे मराठा समाजातले युवक निवडणुकीला उभे राहतील. आपण निवडणूक लढवणार नाही. आपण इतरांना पाडणार, असे म्हणत होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा फुलल्या नाहीत असे निदान उघड बोलले जात होते. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या त्यांच्या दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या घोषणांची पोस्टर्स जरूर लागत होती. पण त्यांच्या आजच्या पुण्यातल्या सभेत जरांगे समर्थकांनीच त्यांची “भावी मुख्यमंत्री” म्हणून पोस्टर्स झळकवली.


मुसलमानांच्या एकाच वेळेच्या मतांची किंमत समजली का उद्धव बाबू?


मनोज जरांगे यांची अशी भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स झळकल्याने महाराष्ट्रातल्या अनेक भावी मुख्यमंत्र्यांची खुर्ची ते बसण्यापूर्वीच डळमळली. लोकसभा निवडणुकीतला महायुती वरच्या विजयामुळे महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांचे मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा फुलली आहे. नाना पटोले यांच्यापासून सुप्रिया सुळे, जयंत पाटील ते अगदी रोहित पवारांपर्यंत अनेक “भावी मुख्यमंत्री” पोस्टरवर उभे राहिले. त्यामध्ये विश्वजीत कदमांसारख्या नेत्यांचाही समावेश झाला.

महायुती जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असली तरी अजित पवार गेली 15 – 20 वर्षे तरी भावी मुख्यमंत्री पदाच्या रांगेत आहेत. मनोज जरांगे यांची भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकल्याने या सगळ्या भावी मुख्यमंत्री यांची खुर्ची ते तिच्यावर बसण्यापूर्वीच डळमळली. कारण मनोज जरांगे यांना मिळणारा वाढता पाठिंबा या सगळ्यांना हादरवून गेला. यापैकी काही नेत्याला एवढा पाठिंबा किंवा एवढ्या मोठ्या प्रचंड सभा कधी घेता आल्या नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे यांची महत्त्वाकांक्षा खरच फुलली आणि त्यांना जनतेचा पाठिंबा मिळाला, तर ते मुख्यमंत्रीपदावर बसतील आणि महाराष्ट्रातले अनेक भावी मुख्यमंत्री बिन खुर्चीचे राहतील ही भीती महाविकास आघाडीतल्याच नेत्यांना भेडसावू लागली आहे.

त्यामुळे मराठा आरक्षण विषय हातात देऊन मनोज जरांगे यांची ठेणगी ज्यांनी पेटवली, त्यांच्याच कडे आता लोकं बोट दाखवू लागली आहेत.

Manoj Jarange patil fututre chief minister

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात