विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याच्या दिवशी देखील मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या तोंडी फक्त पाडापाडीचीच भाषा आली, पण प्रत्यक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा मात्र ते आजही करू शकले नाहीत. वास्तविक मनोज जरांगे यांच्याकडे 3500 पेक्षा जास्त इच्छुकांचे अर्ज आधीच दाखल झाले आहेत. हे सगळे विधानसभा निवडणुकीमध्ये उतरण्याच्या तयारीने जरांगे यांच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. परंतु, जरांगे मात्र निवडणुका जाहीर झाल्या, त्या दिवशी देखील निर्णय जाहीर करू शकले नाहीत. उलट त्यांच्या तोंडी फक्त महायुतीच्या पाडापाडीचीच भाषा आली.
मनोज जरांगे म्हणाले :
मराठा आरक्षणासाठी सरकारचे काय नियोजन आहे, मला माहिती नाही. देवेंद्र फडवणीस यांनी मराठ्यांवर दुर्लक्ष करू नये. त्यांनी दुर्लक्ष केले तर, त्याचे परिणाम वाईट होतील. ज्या रस्त्याकडे मराठा समाजाला जायचे नाही. त्या रस्त्याकडे फडवणीस यांच्या हट्टामुळे, मराठा द्वेषीपणामुळे, मराठ्यांना विनाकारण राजकारणाच्या रस्त्यावर यावे लागेल. मराठा त्या राजकारणाच्या वाटेवर आला. तर तुमची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही.
– आमच्या मागण्यांची अजून वेळ गेलेली नाही. सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा. तुमचे राजकारण तुमची सत्ता तुम्हाला लख लाभ असो. मला आणि माझ्या मराठ्याला राजकारणाकडे जायचे नाही. पण तुम्ही जर मराठ्यांवर दुर्लक्ष करून अन्याय करण्यासाठी सत्ता चालवत असताल. जर तुम्ही आमची वाट लावायला चालले तर माझे मराठे तुमची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. तुमच्या हातात अजूनही वेळ आहे. तुम्ही आचारसंहितेची तारीख पुढे ढकलून मराठ्यांना न्याय देऊ शकता.
– जसे तुम्ही आता कोणाचीही मागणी नसताना 16- 17 जाती ओबीसी आरक्षणात घातल्या. तेही मराठ्यांना छेडून आणि मराठ्यांना खवळून त्यांनी घेतलं. तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देत नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. ही जी खुन्नस दिली, त्याचे त्याचे परिणाम इतके वाईट होतील की तुम्हाला पश्चाताप करायला वेळ राहणार नाही.
– आचारसंहिता लागू द्या. मग त्यांनाही कळेल. या राज्यातील शेतकरी, दलित, मुस्लिम, आणि आठरा पगड जातीचे कर्तव्य काय त्यांच्या लक्षात येईल. माझे पुन्हा पुन्हा म्हणणे आहे. तुम्ही मराठ्यांकडे दुर्लक्ष करून, आमचा अपमान करू नका. तुम्ही मराठ्यांच्या छातीवर नाचून, तुम्ही सत्ता काबीज करायला बघताल, हा तुमचा गैरसमज आहे. या राज्यात मराठ्यांच्या नादी लागलेल्याचा मराठ्यांनी बिमोड केलेला आहे. ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App