abhijit Parrikar car accident : गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र अभिजीत पर्रीकर यांच्या कारला बुधवारी दक्षिण गोव्यातील सुलकोर्न येथे अपघात झाला. या अपघातात सुदैवाने अभिजीत जखमी झाले नाहीत, ते सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते कारमध्ये एकटे होते आणि दुपारच्या वेळी हा अपघात झाला. पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. manohar parrikar son abhijit Parrikar car accident in south goa
विशेष प्रतिनिधी
पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र अभिजीत पर्रीकर यांच्या कारला बुधवारी दक्षिण गोव्यातील सुलकोर्न येथे अपघात झाला. या अपघातात सुदैवाने अभिजीत जखमी झाले नाहीत, ते सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते कारमध्ये एकटे होते आणि दुपारच्या वेळी हा अपघात झाला. पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.
मनोहर पर्रीकर यांचे 2019 मध्ये वयाच्या 63 व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झाले. त्याचे दोन पुत्र उत्पल आणि अभिजीत अद्याप राजकारणात नाहीत. गोव्याचे माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनानंतर भाजपला त्यांच्या मुलांचा समावेश करण्याच्याही बातम्या आल्या होत्या. प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी त्यावेळी म्हटले होते की, पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यांनी दोन्ही मुलांना भाजपमध्ये सामील होण्याची विनंती केली होती.
मनोहर पर्रीकर हे देशाचे पहिले आयआयटी विद्यार्थी होते, जे मुख्यमंत्री झाले. त्यांनी चार वेळा गोव्याचा कारभार पाहिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून पर्रीकर यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. आयआयटी बॉम्बेमधून पदवी घेतल्यानंतरही ते संघाशी संबंधित राहिले. 1994 मध्ये पणजीच्या जागेवर भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकून पर्रिकर यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. 2014 ते 2017 या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात ते संरक्षणमंत्रीही होते.
manohar parrikar son abhijit Parrikar car accident in south goa
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App