वृत्तसंस्था
पुणे : कर्नाटकातील आंबा देवगड हापूस म्हणून विकणाऱ्या तीन आडत्यांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून १७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पुणे मार्केट यार्डात बनावट आंबे विक्रीचा भांडाफोड करण्यात आला आहे. Mango from Karnataka sold in Pune as Devgad Hapus; Penalty for three intermediaries
एच. बी. बागवान, नॅशनल फ्रुट, लोकुमल नारायणदास पंजाबी, अशी आडत्यांची नावे आहेत. बाजार समितीने प्रकरण उघडकीस आणल्यावर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी कारवाईचे आदेश दिले.
कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढली आहे.परंतु, मार्केट यार्डात खरेदीदार किरकोळ विक्रेते आणि घरगुती ग्राहकांना हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री केली जात होती. पणन संचालक सतीश सोनी यांनी आळा घालण्यासाठी कारवाईचे आदेश दिले आहेत.
….तर थेट गुन्हा दाखल करणार
पहिल्यांदा आडत्यांकडून पाच हजारांचा दंड वसूल केला आहे. असाच प्रकार पुन्हा केल्यास दहा हजार दंड ठोठावण्यात येणार आहे. पुन्हा फसवले तर प्रकार थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा मधुकांत गरड यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App