पवारांच्या पक्षाचे 80% यश कोंबड्या पाळण्यावर आले; रोहित पवार – जयंत पाटलांचे समर्थक एकमेकांचीच खेचू लागले!!

Major rift in NCP in betweene rohit pawar and jayant patil supporters against each other

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शरद पवारांच्या पक्षाला लोकसभेत मिळालेले 80 % यश कोंबड्या पाळण्यावर आले; रोहित पवार – जयंत पाटलांच समर्थक खेचू लागले, असे म्हणायची वेळ शरद पवारांच्याच पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आणली आहे. लोकसभेमध्ये शरद पवारांच्या करिश्मावर मिळालेले 10 पैकी 8 जागांचे यश राष्ट्रवादीला पचेनासे झाले आहे. म्हणून ते निकाला पाठोपाठ राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यातच भांडू लागले. Major rift in NCP in betweene rohit pawar and jayant patil supporters against each other

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन सोहळा नुकताच अहमदनगरमध्ये पाडला. या सोहळ्यात स्टेजवर बसलेल्या नेत्यांनी पवारांसमोरच एकमेकांचे वाभाडे काढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला यश पचले नाही. त्याचे अपचन झाले आहे, अशी चर्चा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झाली आहे.

नगरमधील 25 व्या वर्धापनदिन सोहळ्यात रोहित पवार यांनी नाव न घेता थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर टीका केली. त्यानंतर, राज्यात चर्चा सुरू झाली ती पक्षांतर्गत सुरु असलेल्या कलहाची. त्यातच, रोहित पवार समर्थक आणि जयंत पाटील समर्थकही सोशल मीडियातून एकमेकांविरोधात भिडले.

रावेरच्या जागेवरुन रोहित पवार यांनी रोहिणी खडसेंना लक्ष करत आमच्याच पक्षातील लोकांनी काम केलं नसल्याची खंत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली होती. रावेर मतदारसंघात श्रीराम पाटील यांनी चांगली लढत दिली. मात्र, संघटनेकडून आवश्यक ती ताकद न मिळाल्यानं त्यांना यश आलं नाही. यासोबतच या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचं काम केलं नाही, असा दावा रोहित पवारांनी केला, तर जयंत पाटील यांच्याबाबत देखील रोहित पवारांच्या निकटवर्तीय गोठातले राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे त्यांनी जाहीरपणे पोस्ट करून ”निष्ठावान लढाऊ नेते शशिकांत शिंदे आणि युवा आमदार रोहित पवार यांच्यावर आता प्रदेश पक्ष संघटनेची मुख्य जबाबदारी द्यायला हवी. तसेच, सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रीय पातळीवर सुद्धा पक्ष संघटना वाढवली पाहिजे, अशी मागणी केली होती.

जयंत पाटील समर्थकांचा पलटवार

विकास लवांडे यांच्या ट्विटनंतर जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अॅड. भूषण राऊत यांनी नाव न घेता थेट रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. ”राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे कोंबड्या पाळण्याइतके सोप्पे नाहीये”, असे ट्विट राऊत यांनी केले. राऊत यांच्या ट्विटचा रोख थेट रोहित पवारांवर असल्याचे दिसून येते. कारण, बारामती अॅग्रोच्या माध्यमातून रोहित पवार यांचा पोल्ट्रीचाही मोठा उद्योग आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील शीतयुद्ध पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे.

रोहित पवारांच्या भाषणाव शरद पवारांची नाराजी

पण रोहित पवार आणि रोहित पाटील यांना पक्ष संघटनेत जबाबदारी दिली जावी अशी मागणी सातत्यानं कार्यकर्त्यांच्यावतीने केली जात होती. तसेच, याबाबत स्वतः शरद पवार यांनी देखील जयंत पाटील यांना रोहित पवार आणि रोहित पाटील यांना जबाबदारी देण्याबाबत सांगितलं होतं. परंतु, याबाबत जयंत पाटील यांनी टाळाटाळ केल्यामुळेच रोहित पवार नाराज असल्याची माहिती आहे. मागील अनेक दिवसांपासून मनात असणारी खदखद रोहित पवार यांनी थेट जाहीर सभेत व्यक्त केल्यानं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील ही बाब आवडली नसल्याची माहिती समोर आली. शरद पवार यांनी याबाबत सभा संपल्यानंतर नाराजी व्यक्त केल्याचे समजते. दुसरीकडे जयंत पाटील यांनीही आपण पुढील दोन ते तीन महिने अध्यक्ष असून त्यानंतर संघटनेची जबाबदारी कुणाला द्यायची ती द्या, अशी भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नाराजी आता चव्हाट्यावर आली आहे.  यामुळे पवारांच्या पक्षाला लोकसभेतले 80% यश पचनी पडले नसल्याची राज्यभरात चर्चा सुरू झाली.

Major rift in NCP in betweene rohit pawar and jayant patil supporters against each other

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात