सभांसाठी महाविकास आघाडीच्या वज्रमुठी; जागा वाटपामध्ये मात्र मतभेदाची ठिणगी!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कर्नाटक मध्ये काँग्रेसच्या विजयानंतर महाराष्ट्रात खूप वाढलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित सभा घेण्यासाठी आवळल्या वज्रमुठी, पण प्रत्यक्ष जागा वाटपात मात्र मतभेदाची पडली ठिणगी, अशी अवस्था महाराष्ट्रात दिसत आहे. Major cracks appear in MVA over seats sharing for loksabha Elections 2024

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेना लोकसभेच्या 19 जागा जिंकेल, असा दावा केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. संजय राऊत यांनी जागा वाटपाबाबत गैरसमज तयार करणारी वक्तव्य करू नयेत. जागा वाटपाचा निर्णय मेरीट नुसार होईल, असे नानांनी स्पष्ट केले. त्याचवेळी काँग्रेसचे दुसरे नेते माजी मंत्री नसीम खान यांनी देखील काँग्रेस मुंबईत मजबूत स्थितीत येऊन लोकसभेच्या 5 जागा लढवेल असे सांगितले.

त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना आणि काँग्रेस त्याचबरोबर राष्ट्रवादी यांच्यातले मतभेद समोर आले आहेत. शरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीत बंद पडलेल्या वज्रमूठ सभा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जरूर झाला, पण त्या दिवशी आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा टाळण्यात आली. त्यानंतर ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्रसार माध्यमांमध्ये येऊन वेगवेगळी वक्तव्ये केली. त्याचीच पुढची परिणीती आता मतभेदात होताना दिसत आहे.

2019 च्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपा बरोबर युती करून लोकसभेच्या 18 जागा जिंकल्या होत्या त्या अठरा जागा कायम ठेवून दमण दीवची 19 वी जागा देखील शिवसेना जिंकेल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत शिवसेनेचा वाटा 18 जागांचा असल्याचे राऊत यांनी अधोरेखित केल्याबरोबर नाना पटोले आणि नसीम खान यांनी राऊतांच्या वक्तव्याला छेद देणारी वक्तव्ये केली.

काँग्रेस नेत्यांची 21 तारखेला बैठक होत आहे. त्यासाठी 3 नेते महाराष्ट्रातून पाठवले जातील. मेरिटनुसार महाराष्ट्रात आघाडीतल्या जागावाटपासाठी चर्चा सुरू केली जाईल, असे नानांनी स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी राऊतांना आघाडीतले मतभेद होतील, असे कोणतेही वक्तव्य करू नका, असा सल्ला दिला. पण त्यातून आघाडीतले मतभेद अधिक अधोरेखित झाले.

Major cracks appear in MVA over seats sharing for loksabha Elections 2024

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात