भीषण अपघात; जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू

२० पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. या मार्गावरील बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ एक   खासगी बस पहाटे चार वाजता दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात घडला. प्राप्त माहितीनुसार सात ते आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, २० पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी आहेत.  Major accident 8 people died after a private bus fell into a ravine on the old Mumbai Pune highway

या बसमध्ये ४० पेक्षा अधिक प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे. बस पुण्यावरून मुंबईच्या दिशेने निघाली होती, दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य तातडीने युद्धपातळीवर सुरू झाले.

प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत २५ प्रवाशांना दरीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे, तर अद्यापही जवळपास १५ पेक्षा अधिक प्रवासी अडकलेले आहेत.

Major accident 8 people died after a private bus fell into a ravine on the old Mumbai Pune highway

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात