विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde आम्ही केलेल्या विकासकामांची जनतेला पोचपावती मिळाली. या विजयामुळे पुढील काळात आमची जबाबदारी वाढली आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.Eknath Shinde
एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, समाजातील प्रत्य़ेक घटकाचे अभिनंदन करतो. महायुतीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. महायुतीला आशीर्वाद दिल्याबद्दल जनतेचे आभार मानतो. मुख्यमंत्रीपदाचे अजून काही ठरलेले नाही, तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून चर्चा करत मुख्यमंत्री कोण हे ठरवणार असे त्यांनी म्हटले आहे.
लाडक्या बहिणींनी योजनेने सर्व पोल फोल ठरवले. यांचा विरोधी पक्षनेता होईल अशीही परिसथिती नाही, कोण खरे आणि कोण खोटे हे जनतेने ठरवले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या मनातील शिवसेना कोणती हे यातून दिसून येत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आजचा हा मोठा विजय आहे. तो जनतेचा आहे. हे गरिबांचे सरकार असून आम्ही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
उद्धव ठाकरेंची ही परिस्थिती संजय राऊतांमुळे
उद्धव ठाकरेंची ही परिस्थिती संजय राऊत यांच्यामुळे झाली आहे. 24 तास लोकांची सेवा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लोकांनी साथ दिली आहे. राऊत यांना महाराष्ट्रातील जनतेने जोडे मारले आहेत. गिरे तोभी टांग उपर अशी त्यांची परिस्थिती आहे, असे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.
नरेश म्हस्के पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार यांचे उबरठे झिजवणे, सोनिया गांधी मांडिलकत्व स्वीकारणे. उद्धव ठाकरे यांची जी दशा झाली आहे, त्यांनी आता तरी योग्य ती दिशा घ्यायला हवी. संजय राऊतमुळे उद्धव ठाकरेंची वाताहत झाली हे लोकांच्या समोर आले आहे. आता संजय राऊत यांना महाराष्ट्रातील जनता तोंडवर जोडे मारतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App