शिंदे + भाजपच्या पत्रकार परिषदांनंतर महायुती मजबूत; मोदी + शाह कार्ड एक्टिवेशन नंतर महाराष्ट्रात कुठल्या नव्या प्रयोगाची नांदी??

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर चार दिवस झाले तरी सरकार स्थापन झाले नाही याची “चिंता” मराठी माध्यमांना लागली होती. ती “चिंता” काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन दूर केली. त्यांनी महायुतीचे सरकार स्थापन होण्यात आणि भाजपचा मुख्यमंत्री होण्यात आपल्या अडसर नसल्याचा स्पष्ट खुलासा केला. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना स्वतःहून फोन करून आपली भूमिका सांगितल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. Mahayuti strengthened after Shinde + BJP press conferences

त्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये देखील मोदी + शाह कार्ड महाराष्ट्र संदर्भात ऍक्टिव्हेट होते, हे देखील उघड झाले. कारण गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये मराठी माध्यमांनी बातम्या चालवताना एकनाथ शिंदे नाराज आहेत, भाजपने त्यांना दिलेली ऑफर त्यांनी नाकारली, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री होणे मंजूर नाही, वगैरे अटकळी बांधल्या होत्या त्या सगळ्या अटकळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये फेटाळून लावल्या.

एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे स्वागत केले. महायुती मजबूत झाल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

त्यामुळे आता मराठी माध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाल्याच्या बातम्या सुरू केल्या मात्र या सगळ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि शाह हे जर कार्ड ऍक्टिव्हेट असेल तर ते महाराष्ट्रामध्ये नेमका कुठला नवा प्रयोग करणार??, याविषयीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या हक्काचे मुख्यमंत्री व त्यांना देऊन त्यांचे सगळे मंत्रिमंडळ बदलून टाकणार का भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी मधून संपूर्णपणे नव्या चेहऱ्यांनाच मंत्रिमंडळात संधी देणार का??, असा सवाल या निमित्ताने तयार झाला आहे. कारण गुजरात मध्ये मोदी आणि शाह यांनी असाच प्रयोग केला होता. तिथे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ एका झटक्यात बदलून टाकले. त्यामुळे भाजपच्या नवीन आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना जरी त्यांनी मुख्यमंत्री केले, तरी त्यांच्या मंत्रिमंडळात भाजपच्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर तो गुजरात सारखाच नवा प्रयोग ठरू शकतो. मोदी आणि शाह असे “सरप्राईज प्रयोग” करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, त्याचाच प्रत्यय महाराष्ट्रात देण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

Mahayuti strengthened after Shinde + BJP press conferences

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात