आमदार गोपीचंद पडळकर यांना अटक करण्याचा महाविकास आघाडीचा डाव, एसटी संप मोडून काढण्यासाठी जुन्या प्रकरणशतील अटकपूर्व जामीन फेटाळला

विशेष प्रतिनिधी

सांगली : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचाºयांनी सुरू केलेला संप मिटण्यास तयार नाही. भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाºयांच्या प्रश्नावरून रान उठवले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारने पडळकर यांन अटक करण्याचा डाव आखला आहे. एसटी संप मोडून काढण्यासाठी कट रचला जात आहे.Mahavikas Aghadi’s plot to arrest MLA Gopichand Padalkar, pre-arrest bail in old case rejected to break ST strike

शेकडो एसटी कर्मचाºयांसोबत गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून आहे. पडळकर आणि खोत यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महाविकास आघाडी सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांचा एका प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे पडळकर यांना आता कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.




सांगलीच्या आटपाडी राडा प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांचा अटकपूर्व जामीन अजार्साठी न्यायालयात धाव घेतली होती. त्या अर्जावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने पडळकर आणि पाटील यांचा अर्ज पेटाळला आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. व्ही. जगताप यांच्यासमोर सुनावणी पार पडली. सांगली जिल्हा बँक निवडणुकीच्या धामधुमीत आटपाडीत झालेल्या राड्यामुळे तणावाचे वातावरण आहे. आमदारांनी अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला,

असा आरोप राजू जानकर यांनी केलाय. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करत गाडीची तोडफोड केली. त्यानंतर परस्पर विरोधी फियार्दी देण्यात आले. त्या प्रकरणात 10 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. आमदार पडळकर यांच्यावर खुनी हल्ल्याचा तर माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांच्यावरही बेकायदा जमाव जमवल्याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपविण्यात आला आहे.

त्यांच्याकडून आटपाडी तालुक्यात छापेमारी करण्यात आली. आमदार पडळकर, तानाजी पाटील, राष्ट्रवादीचे राजू जानकर यांची आलीशान चार वाहने जप्त केली. त्यानंतर आमदार पडळकर आणि तानाजी पाटील यांनी अटकपूर्व जामीन अजार्साठी धाव घेतली. त्यावर आज सुनावणी पार पडली. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

त्यामुळे कोणत्याही क्षणी दोघांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गोपीचंद पडळकर याबाबत म्हणाले, पोलीस त्यांची कारवाई करु शकतात. मी आझाद मैदानावरच आहे. पोलिसांनी मला बोलावलं तर मी जाईल.

महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही माध्यमातून एसटी कर्मचाºयांचा संप मोडायचा होता. मी मुंबईत येत असतानाच अडवणूक करण्यात आली होती. त्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आता कोटार्ने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे पोलीस त्यांची कारवाई करतील.

Mahavikas Aghadi’s plot to arrest MLA Gopichand Padalkar, pre-arrest bail in old case rejected to break ST strike

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात