विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mahavikas Aghadi महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष आपापसातली चर्चा पूर्ण करून जागावाटप करण्यामध्ये अजून तरी अपयशी ठरले असताना महाविकास आघाडीच्या बेरजेच्या राजकारणा ऐवजी वजाबाकीचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र समोर आले आहे. महाविकास आघाडीतल्या मोठ्या तीन घटक पक्षांनी शेतकरी कामगार पक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी यांना तर दूर सारलेच, पण आता समाजवादी पार्टी देखील महाविकास आघाडी पासून दूर जात स्वतःचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व महाराष्ट्रात शोधायला बाहेर पडली आहे. Mahavikas Aghadi
समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव मुंबई ठाण्यापलीकडचा प्रभाव शोधत उत्तर महाराष्ट्र मध्ये घुसायच्या बेतात आहेत. ते उत्तर महाराष्ट्रात समाजवादी पार्टीची संघटना उभी करू पाहत आहेत.
समाजवादी पार्टीचा मुंबई आणि ठाण्याच्या पट्ट्यामध्ये विशिष्ट क्षेत्रावर प्रभाव आहे. शिवाजीनगर मानखुर्द मध्ये तर अबू असीम आझमी हे समाजवादी पार्टीचे आमदार आहेतच, याखेरीज मुस्लिम मतदारांची एक गठ्ठा मतदान असलेल्या क्षेत्रांमध्ये समाजवादी पार्टीची विशिष्ट मते आहेत. त्यापलीकडे सध्या तरी समाजवादी पार्टीचा महाराष्ट्रात इतरत्र प्रभाव नाही. परंतु आता अखिलेश यादव यांनी धुळे आणि मालेगाव या उत्तर महाराष्ट्रातल्या मुस्लिम प्रभाव क्षेत्रावर आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी दौरा करण्याचे ठरविले आहे. Mahavikas Aghadi
2024 या निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघाचा निकाल एकट्या मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाने फिरवला. सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी आघाडी घेतली असताना, केवळ मालेगाव मध्य मधून डॉक्टर शोभा बच्छाव यांनी आघाडी घेतली म्हणून धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे आली. आता याच मतदारसंघांमध्ये समाजवादी पार्टी सेंधमारी करणार आहे. हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर मोठा आघात असण्याची शक्यता आहे. कारण या दोनच पक्षांची मतपेढी धुळे – मालेगाव पट्ट्यामध्ये मजबूत आहे. त्यामुळे अखिलेश यादव यांचा धुळे – मालेगावचा दौरा महाविकास आघाडीसाठी वजाबाकीचे राजकारण ठरणार आहे.
समाजवादी पार्टीने महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे 30 जागा मागितल्या आहेत. त्यातून 12 ते 15 जागा पदरात पाडून घेण्यासाठी इरादा आहे. पण महाविकास आघाडीतल्या तीन मोठ्या घटक पक्षांनी समाजवादी पार्टीला त्या जागा सोडल्या नाहीत, तर समाजवादी पार्टी 30 जागांवर उमेदवार उभे करणार आहे याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसण्याची दाट शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App