2030 पर्यंत 50 टक्के वीजनिर्मिती हरित ऊर्जेवर आधारित असेल, असंही फडणवीसांनी सांगितलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नॅसकॉमचे श्रीकांत वेलामकन्नी यांनी मुलाखत घेतली. या चर्चेदरम्यान, महाराष्ट्र लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल तसेच राज्य शासन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करून प्रशासन आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती देत असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.Devendra Fadnavis
राज्य सरकार डिजिटल सेवांचा विस्तार करत असून, मुंबई विद्यापीठात एआय सेंटर आणि इंडस्ट्री केंद्र स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्राने 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले असून, मुंबई महानगर क्षेत्राला 1.5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील 60 टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात असून, नवीन मुंबईत डेटा सेंटर पार्क उभारले जात आहे. 2030 पर्यंत 50 टक्के वीजनिर्मिती हरित ऊर्जेवर आधारित असेल. मुंबई ‘फिनटेक राजधानी’ असून 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली.
तसेच शेतीमध्ये तंत्रज्ञानाद्वारे उत्पन्न दुप्पट करण्यावर भर असून, ‘ॲग्री-स्टॅट’ आणि ‘ड्रोन शक्ती’ उपक्रम राबवले जात आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात ‘इनोव्हेशन सिटी’ विकसित करण्यात येणार असून, मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथे जीसीसी पार्क उभारले जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App