विधान परिषद : रात्रीस खेळ झाला, पहाटेपर्यंत चालला; महाविकास आघाडीतच मतांची खेचाखेच!!; काँग्रेसचे शिवसेनेला साकडे!!


प्रतिनिधी

मुंबई : राज्यसभेतील पराभवाच्या सावटाखाली होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत रात्रीस खेळ झाला. पहाटे पर्यंत चालला. परंतु ही मतांची खेचाखेची महाविकास आघाडीतच चालली. काँग्रेसने शिवसेनेकडे पहिल्या पसंतीच्या 4 मतांची मागणी केली. त्यामुळे काँग्रेसबरोबर शिवसेनेचे ही उमेदवारी धोक्यात असल्याची जाणीव सगळ्यांना झाली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार मात्र सध्या निवांत आहेत. पण एकनाथ खडसे भाजपच्या टार्गेटवर आहेत.Maharashtra state council Elections : Congress demands 4 first preference votes

विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १० जागांसाठी सोमवारी (ता.२०) मतदान होत आहे. भाजपचे ५ आणि महाविकास आघाडीचे ६ असे ११ उमेदवार रिंगणात असून सत्ताधारी आघाडीची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागली आहे. राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर होणाऱ्या या निवडणुकीत आघाडीला पुन्हा अपयश आल्यास तीन पक्षांच्या बनलेल्या राज्य सरकारच्या स्थैर्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. शिवसेनेकडे अतिरिक्त १० मते आहेत. ती आपल्या दुसऱ्या उमेदवारास मिळावीत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.



आघाडीच्या संयुक्त रणनीतीवर विचार करण्यासाठी रात्री निवडक नेत्यांची ट्रायडंटमध्ये बैठक झाली. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. आघाडीकडे १७० आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सहा उमेदवारांपैकी प्रत्येकास २८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आल्याचे समजते. भाजपनेही कोटा ठरवल्याचे समजते. रात्रभर कोटा ठरवण्यावर भर होता.

रविवारी मुंबईत हॉटेल डिप्लोमसीला जोर आला होता. क्रॉस व्हाेटिंगची भीती सर्वच पक्षांना आहे. २९ अपक्ष आमदार कुणाला मतदान करतात यावरच सर्व गणित अवलंबून आहे. सोमवारी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान होईल. सायंकाळी ५ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. भाजपच्या आमदारांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कफ परेड येथील ताज प्रेसिडेन्सीमध्ये कानमंत्र दिला. भाजप या निवडणुकीत कोटा वाढवून न घेता प्रत्येक उमेदवारासाठी असलेले २७ चे लक्ष्य गाठण्याच्या विचारात आहे. शिवसेनेचा रविवारी ५६ वा वर्धापन दिन होता. त्याचा कार्यक्रम सेनेचे आमदार ठेवण्यात आलेल्या पवईच्या हॉटेल वेस्ट इनमध्ये पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी शिसेना आमदारांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेस आमदारांना वरळीतील फाेर सीझन हॉटेलात राज्य प्रभारी एच. के. पाटील यांनी मतदानासाठीचे मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीच्या आमदारांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नरिमन पाॅइंटच्या ट्रायडंटमध्ये रात्री ८ वाजता परेड घेतली. दरम्यान, या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा चांगला भाव वधरला आहे. रविवारी हितेंद्र ठाकूर यांची अनेक पक्षांच्या नेत्यांसह उमेदवारांनी भेट घेतली.

धुळ्याचे एमआयएम आमदार फारुख शहा यांचे एकनाथ खडसेंना मत

चारही पक्षांनी आमदारांना व्हीप जारी केला, मात्र गुप्त मतदान असल्याने क्रॉस व्हाेटिंगची सर्व पक्षांना भीती आहे. एमआयएमचे धुळ्याचे आमदार फारुख शहा अजित पवारांना भेटले. एकनाथ खडसे यांना मतदान करणार, असे त्यांनी सांगितले. खडसे यांनी “बविआ’ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना भेटून ३ मतांची मागणी केली. अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी आपण महाविकास आघाडीसोबत नसून राष्ट्रवादीसोबत असल्याचे स्पष्ट केले.

असे आहेत पक्षनिहाय उमेदवार -१३ अपक्ष, १६ छोटे पक्ष “किंगमेकर’

भाजप :
-प्रवीण दरेकर -राम शिंदे -श्रीकांत भारतीय
-उमा खापरे -प्रसाद लाड

राष्ट्रवादी : -एकनाथ खडसे -रामराजे नाईक-निंबाळकर

शिवसेना : -आमशा पाडवी -सचिन अहिर

काँग्रेस : -चंद्रकांत हंडोरे -भाई जगताप

एकूण आमदार २८५, मतांचा कोटा : २६, १० जागांसाठी ११ उमेदवार इतर : २९ मते = अपक्ष १३, छोटे पक्ष १६, अपात्र : ०३ मते = ०१ निधन, ०२ आमदार तुरुंगात

-शिवसेना ५५ मते, ७ अपक्षांचा पाठिंबा : २ जागा, १० मते जास्त
-राष्ट्रवादी ५१ मते :
०२ जागा, ०३ मतांची गरज
-काँग्रेस ४४ मते :
०२ जागा, ८ मतांची गरज
-भाजप १०६ मते :
०५ जागा, २९ मतांची गरज

Maharashtra state council Elections : Congress demands 4 first preference votes

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात