महाराष्ट्र पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान, पण मुख्यमंत्री – पवारांकडून अद्याप दखल नाही!!… का??

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र पोलिसांनी काल गडचिरोली जिल्ह्यात ग्यारापत्ती भागातील जंगलात अत्यंत धाडसी आणि धडाकेबाज कारवाई करून 26 नक्षलवाद्यांना ठार केले. यामध्ये तब्बल 50 लाखांचे डोक्यावर इनाम असणारा भीमा कोरेगाव दंगलीचा आरोपी आणि कुप्रसिद्ध नक्षलवादी म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश आहे. त्याच्यासह अनेक नक्षलवादी कमांडर्स महाराष्ट्र पोलिसांच्या धडाकेबाज कारवाई ठार झाले आहेत.Maharashtra Police’s explosive performance

या कारवाईला 24 तास उलटून गेल्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज मिलिंद तेलतुंबडे आणि नक्षलवाद्यांचे अन्य कमांडर्स ठार झाल्याची बातमी कन्फर्म केली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांचे कालच त्यांनी ट्विटरवरून अभिनंदन केले होते. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातली ही मोठी धडाकेबाज कारवाई असल्याचे त्यांनी आवर्जून ट्विटमध्ये नमूद केले होते.


मिलिंद तेलतुंबडेला माओवादी बनण्यास डॉ. आनंद तेलतुंबडे यांची चिथावणी; एनआयएने केला होता कोर्टात युक्तिवाद


महाराष्ट्र पोलिसांची ही कामगिरी खरोखरच स्पृहणीय आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी मात्र अद्याप महाराष्ट्र पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीची दखल घेतलेली दिसत नाही. आजच्या बालदिनी 14 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11.15 पर्यंत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या ट्विटर हँडल वरून महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन करणारे एकही ट्विट आले नव्हते किंवा प्रतिक्रियाही वाचायला मिळाली नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या आजारी आहेत. त्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाली आहे. शरद पवार यांनी आज बालदिनानिमित्त पंतप्रधान कै. पंडित नेहरू यांना आदरांजली वाहणारे ट्विट केले आहे/ त्याच बरोबर आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांनाही श्रद्धांजली वाहणारे ट्विट केले आहे. परंतु महाराष्ट्र पोलिसांची धडाकेबाज कामगिरीची दखल घेणारे ट्विट त्यांनी सकाळी 11.15 वाजेपर्यंत केले नव्हते याबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी बऱ्याच वर्षांनी एवढी अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. या कामगिरीचा संपूर्ण देशात डंका वाजवत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा महाविकास आघाडीचे शिल्पकार याबद्दल अद्याप एकही शब्द का बोलले नाहीत?, याची दबक्या आवाजात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Maharashtra Police’s explosive performance

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात