विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भोंग्या बाबतच्या भूमिकेच्या विरोधात मत मांडले आणि त्यांची पुणे शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर वसंत मोरे यांना विविध पक्षातून पक्षात येण्याची ऑफर मिळाली. मात्र, वसंत मोरे यांनी मनसे मध्येच राहणार असल्याचे स्पष्ट करत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. अखेर राज ठाकरे यांनी मोरे यांना सोमवारी भेटणे करीता मुंबईत बोलावून घेतले असून वसंत मोरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पुण्यातून सोमवारी सकाळी रवाना झाले.
राज ठाकरेंच्या भूमिकेवरून विरोधकांना पोटदुखी, रावसाहेब दानवे यांचा आरोप
वसंत मोरे याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, मनसे पुणे शहराध्यक्ष असताना तळागाळापर्यंत पक्ष पोहोचणे काम मी केले आहे. परंतु माझ्या कामामुळे पक्षाचे काही पार्ट टाइम जॉब करणाऱ्यांना ते रुचले नाही आणि त्यांनी माझ्या विरोधात प्रचार केला. राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली होती, त्यानुसार मला माझ्या मतदार संघात भूमिका घेणे पटत नसल्याने मी माझे वैयक्तिक मत मांडले होते. परंतु त्यावरून काही जणांनी हेतु परस्पर विपर्यास करून अनेक गोष्टी मांडल्या आहे. पक्षतील काही नेमणुकीच्या संदर्भात काही नावे मी दिली होती त्या सदस्यांची नियुक्ती न करणे, त्यांना बैठकींचे निरोप न देणे, माझ्या विरोधात अपप्रचार करणे अशा गोष्टी घडत असल्याचे जाणवले. पक्षातील माझ्या सहकारी रूपाली पाटील या पक्ष सोडताना याच अंतर्गत कारणीभूत ठरल्या असे वाटते. त्यांनी पक्ष सोडण्याचे निश्चित केले होते त्यामुळे त्यांची समजूत काढून ही त्या पक्षात थांबल्या नाही. मात्र, मी पक्षातच राहणार असून यापुढेही राज ठाकरे यांच्या सोबतच काम करणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App