आवाजी पध्दतीने होणार विधानसभा अध्यक्षांची निवड, निवड समितीचा निर्णय

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा अध्यक्षांच्या नियुक्तीसाठी परंपरागत चालत आलेली गुप्तमतदान पध्दती बदलून आता आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. नाना पटोले ह्या पदावरून पायउतार झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष निवडीचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. या निर्णयाला 22 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नियम बदलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयावर भाजपने मात्र हल्ला चढवला आहे.

maharashtra legislative assembly speaker will be elected by voice vote desicion

उत्तर प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांतील विधानसभा आणि विधान परिषदेच्या अध्यक्ष आणि सभापतीच्या निवडी या गुप्तमतदान पध्दतीनेच घेतल्या जातात. तर महाराष्ट्रामध्ये अशी कोणती घटना घडली? की ज्यामुळे नियम बदलले जात आहेत. असा सवाल भाजप सदस्यांनी उपस्थित केला आहे.

मागे भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आले होते. 6 जुलै रोजी झालेल्या नियम समितीच्या बैठकीला भाजप सदस्यांना जाणूनबुजून बोलावण्यात आले नव्हते असा आरोपही भाजप सदस्यांनी केलेला आहे.


बिहार विधानसभेच्या सभागृहात प्रथमच पोलिसांचा शिरकाव, वादग्रस्त विधेयक अखेर मंजूर


तर या पाश्र्वभूमीवर चंद्रकांतदादा पाटील यांनी हिंमत असेल तर गुप्तमतदान घ्यावे असे महाविकास सरकारला आव्हान केले आहे.

विधान परिषदेच्या नागपूर, अकोला, बुलडाणा, वाशीम या स्थानिक स्वराज्य संस्थां मधील मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार मोठ्या आघाडीने विजयी झालेले आहेत. म्हणूनच महाविकास आघाडीने जाणूनबुजून गुप्तमतदान पध्दत बंद करून आवाजी मतदान घेण्याचा नवा डाव आखला आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

maharashtra legislative assembly speaker will be elected by voice vote desicion

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात