बिहार विधानसभेच्या सभागृहात प्रथमच पोलिसांचा शिरकाव, वादग्रस्त विधेयक अखेर मंजूर

वृत्तसंस्था

पाटणा : बिहार विधानसभेत कोणालाही वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना देणाऱ्या विधेयकावरून प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षातील आमदारांनी विधेयकाला विरोध करत अध्यक्षांच्या दालनाबाहेर धरणे धरले. त्यानंतर, पोलिसांना पाचारण करण्यात आले. Contoversal bill passed in Bihar vidhansabha

पोलिसांनी त्यांना लाथा मारून बाहेर काढले. तरीही उशीरापर्यंत गोंधळ सुरूच होता.
बिहार विधानसभेच्या इतिहासात प्रथमच पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलिसांच्या उपस्थितीतच सभागृहाचे कामकाज सुरू झाले. अखेरीस ‘बिहार शस्त्रास्त्र कायदा सुधारित विधेयक २०२१’ संमत करण्यात आले.मंगळवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी सदस्यांनी विधेयकाविरुद्ध जोरदार घोषणाबाजीस सुरूवात केली. त्यानंतर, सभागृहाचे कामकाज पाचवेळा स्थगित करावे लागले. तत्पूर्वी, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव व त्यांचे भाऊ तेज प्रताप यादव यांच्या नेतृत्वाखाली राजद कार्यकर्त्यांनी विधानसभेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो मध्येच रोखला. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेकही केली. पोलिसांनी पाण्याचा मारा करून त्यांना पांगविले.

Contoversal bill passed in Bihar vidhansabha

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*