अभिमानास्पद : मराठी माणसाकडून इलेक्ट्रिक कारची निर्मिती, कांबळे बंधूंची स्वदेशी डेक्स्टो कार लवकरच धावणार रस्त्यावर

maharashtra Kamble Brothers Developed indigenous EV Dexto Electric car, will soon run on road

Dexto Electric Car : सर्व जग आता ईव्ही अर्थात इलेक्ट्रिक व्हेइकलच्या खरेदीकडे वळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य त्रस्त असताना ईव्हीच्या रूपाने मोठा दिलासा मिळणार आहे. ईव्हीच्या बाजारपेठेवर दिग्गज आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा ताबा आहे. परंतु त्यांची ही मक्तेदारी मोडण्यासाठी महाराष्ट्रातल्या कांबळे बंधूंनी निश्चय केला आहे. रोहन कांबळे आणि शशिकांत कांबळे यांच्या ‘डेक्स्टो’ अ‍ॅटोमोबाईल अँड पॉवर सोल्यूशन प्रा. लि. कंपनी या दिशेने काम करत आहे. maharashtra Kamble Brothers Developed indigenous EV Dexto Electric car, will soon run on road


विशेष प्रतिनिधी

पुणे : सर्व जग आता ईव्ही अर्थात इलेक्ट्रिक व्हेइकलच्या खरेदीकडे वळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य त्रस्त असताना ईव्हीच्या रूपाने मोठा दिलासा मिळणार आहे. ईव्हीच्या बाजारपेठेवर दिग्गज आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा ताबा आहे. परंतु त्यांची ही मक्तेदारी मोडण्यासाठी महाराष्ट्रातल्या कांबळे बंधूंनी निश्चय केला आहे. रोहन कांबळे आणि शशिकांत कांबळे यांच्या ‘डेक्स्टो’ अ‍ॅटोमोबाईल अँड पॉवर सोल्यूशन प्रा. लि. कंपनी या दिशेने काम करत आहे.

रोहन कांबळे सांगतात की, बेळगाव येथे इजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘विप्रो’सारख्या कंपनीत मॅनेजर पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्या निमित्ताने कॅलिफॉर्निया, दुबई, जर्मनी, चीन या ठिकाणी काम करायला मिळाले. बारावीला असल्यापासूनच गाड्यांचे आकर्षण होते. काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याचा ध्यास होता. अनेक वेगवेगळे यशस्वी प्रयोग केल्यानंतर चीन येथे यशस्वीपणे इलेक्ट्रीकल कार बनविण्यामध्ये माझा सहभागही महत्त्वाचा होता. त्यानंतर भारतात आल्यावर वाटलं की, आपण इलेक्ट्रीकल कार का निर्माण करू नये? याचदरम्यान माझे जवळचे बंधू शशिकांत कांबळे यांना भेटलो. माझ्या मनातील इलेक्ट्रीकल कारच्या कंपनीची कल्पना सांगितली. त्यांनाही कल्पना खूप आवडली. त्यावेळी ते भारती विद्यापीठमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करीत होते. मग ‘डेक्स्टो’ या नावाने कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. जर्मनी, दुबई, चीन या ठिकाणी असलेल्या माझ्या मित्रांनाही ही कल्पना फार आवडली. त्याप्रमाणे 2018मध्ये आम्ही कंपनीची स्थापना केली.

इतर कंपन्यांपेक्षा वेगळे देण्याचा प्रयत्न

कांबळे पुढे म्हणाले, इतर कंपन्यांच्या तुलनेत आपण काय वेगळे देऊ शकतो यावर आम्ही मित्रांनी संशोधन केले. बॅटरी, चार्जर, कारचे अ‍ॅवरेज, यावर फोकस दिला. आणि महत्त्वाचे म्हणजे कारची सुरक्षितता यावर संशोधन झाले. चीनमध्ये जाऊन तेथील यशस्वी आठ कंपन्यांबरोबर सामंजस्य करार केला. जर्मनी येथील कंपनीबरोबर चार्जिंग सेंटरबाबत सामंजस्य करार केला. ज्या देशांमध्ये इलेक्ट्रिकल कार कोणत्या कारणांमुळे यशस्वी झाली, त्या त्या देशांच्या सरकारी योजना काय आहेत, याचा अभ्यास आम्ही केला. आपल्या देशामधील रस्त्यावर ही कार चालविण्यासाठी आपण कोणते अ‍ॅडव्हान्स फिचर्स देऊ शकतो हाही अभ्यास आम्ही केला आणि आपल्या कारसाठी सिंगल चार्जिंगमध्ये आपण 350 किमी अ‍ॅव्हरेज देत आहोत. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे बॅटरी स्वॅपिंग सेंटरचेही नियोजन केले आहे. लवकरच आपण आपल्या कंपनीची डेमो कार लाँच करत आहोत.

कांबळेंच्या स्वप्नाला दिग्गजांची साथ

या कंपनीची दुसरी बाजू सांभाळणारे शशिकांत कांबळे सांगतात, ‘रोहनने कारची कंपनी सुरू करू या सांगितल्यानंतर सुरुवातीला थोडं अवघड वाटलं. पण वाटलं बघूया करूच आपण. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला विविध प्रकारच्या व्यक्ती भेटतात. अनेक घटना-प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातून वेगवेगळे अनुभव येतात. त्यातले काही अनुभव चांगले असतात. काही घटना वाईट, काही सुखकारक असतात. तर काही अनुभव मन थक्क करणारे असतात. त्यावेळी भारती विद्यापीठात काम करत होतो. डॉ. पतंगराव कदम हे नेहमी सांगायचे, की आपला उद्देश चांगला असेल आणि अंगी जिद्द असेल तर कितीही मोठं स्वप्न पाहा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. तुमचं स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागत नाही. हे अनुभव पाठीशी असल्यामुळे आम्ही ठरवले की, आपण असंच करायचं.
कार कंपनीसाठी लागणारे मोठे भांडवल आणि त्याच बरोबर डेमो कारसाठी लागणार खर्च हे सगळं आपल्याला जमणार का, हा विचार सुरू असताना आपल्याला मार्गदर्शन करणारी टीम पाठीशी असेल तर मार्ग मिळेल म्हणून या टीममध्ये येण्यासाठी आम्ही यू.जी.सी.चे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, सर्जिकल स्ट्राइकचे लेफ्ट. जनरल राजेंद्र निंभोरकर, कमानी ट्यूबच्या अध्यक्षा पद्मश्री कल्पना सरोज आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर मॅडम यांना विनंती केली. आणि आमची मार्गदर्शन टीम तयार झाली.

डेक्स्टोची टीम

‘डेक्स्टो’ कंपनीच्या डिझाइन आणि आपले वेगळेपण यामुळे महाराष्ट्र शासनाच्या इलेक्ट्रीक वाहनांच्या संदर्भातील धोरणामुळे आम्हाला कंपनीसाठी जागा द्यायला हे सरकार नक्कीच मदत करेल, असे वाटत आहे. त्यामुळे सध्या आम्ही डेमो कारच्या कामावर फोकस केला आहे. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान आपल्या कंपनीची ई-रिक्षा लाँच करण्याचा आमचा मानस असल्यामुळे ‘डेक्स्टो’ कंपनीचे हे स्वप्न मोठे आहे. सामान्य कुटुंबातून हे निर्माण करणं अवघड असतं, परंतु साथ देणारी टीम आणि आपली ध्येय, धोरणे, चांगली असतील तर अवघड कामही सोपं होतं, हे वेगळं सांगायला नको. फ्रॅन्क ड्युएन (चीन), पीटएली (चीन), रॉबर्ट अंडरसन (कॅलिफॉर्निया), क्रीस्टीन लँग (बर्लिन), डॉ. महेश ठोणे (जर्मनी), गणेश सोनवणे (पुणे) अशी ही ‘डेक्स्टो’ची टीम आहे.

maharashtra Kamble Brothers Developed indigenous EV Dexto Electric car, will soon run on road

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात