Maharashtra Home Minister Valse Patil : महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी क्रूझवरील छाप्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने टाकलेला क्रूझ छापा बनावट होता की नाही, याची चौकशी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचा तपास मुंबई पोलीस करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आर्यन खान जामीन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिलेले निरीक्षण पाहता हे संकेत देण्यात आले आहेत. Maharashtra Home Minister Valse Patil said whether the cruise raid was fake or not, Mumbai Police will investigate
वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी क्रूझवरील छाप्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने टाकलेला क्रूझ छापा बनावट होता की नाही, याची चौकशी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचा तपास मुंबई पोलीस करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आर्यन खान जामीन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिलेले निरीक्षण पाहता हे संकेत देण्यात आले आहेत.
आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांच्या जामीन अर्जावरील तपशीलवार आदेशात न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी नुकतेच असे निरीक्षण नोंदवले होते की, “षड्यंत्र आणि हेतू” संबंधित एनसीबीच्या आरोपांवर त्यांच्याविरुद्ध “प्रथमदृष्टया काही सकारात्मक पुरावे नाहीत.”
याबाबत दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता, या पार्श्वभूमीवर एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील छापा बनावट होता की नाही, याचा तपास शहर पोलिस करणार असल्याचे सांगितले. मुंबई पोलिसांचा हा दुसरा तपास असेल, जे 27 ऑक्टोबरपासून वानखेडे विरुद्ध एनसीबीच्या साक्षीदाराच्या “खंडणी”च्या आरोपांची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप सावंत यांच्या देखरेखीखाली चार सदस्यीय पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. याप्रकरणी एनसीबीच्या साक्षीदारांसह अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी जहाजावर ‘बनावट’ छापे टाकणे, जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी उच्चभ्रू व्यक्तींना टार्गेट करणे, शाहरुख खानकडून मुलगा आर्यनच्या सुटकेसाठी खंडणी मागणे अशा विविध प्रकरणांत वानखेडेंवर एकामागून एक आरोप केले जात आहेत.
वानखेडे यांनी आयआरएसमध्ये आरक्षित प्रवर्गात नोकरी मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. जहाजावर छापा टाकल्यानंतर एनसीबीने एकूण 20 जणांना अटक केली होती, त्यापैकी आर्यन खान, धमेचा आणि मर्चंट यांच्यासह बहुतांश जणांना जामीन मिळाला आहे.
Maharashtra Home Minister Valse Patil said whether the cruise raid was fake or not, Mumbai Police will investigate
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App