working hours of women police personnel : महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे म्हणाले की, राज्य सरकारने महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास 12 वरून 8 करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पुणे ग्रामीण पोलिसांनी महिला पोलिस कॉन्स्टेबलसाठी आठ तासांच्या शिफ्ट सुरू केल्या. जर हा उपक्रम यशस्वी ठरला तर, आठ तासांची शिफ्ट पुरुष पोलीस कॉन्स्टेबलसाठीही केली जाईल,” असे पुणे ग्रामीण पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले होते. Maharashtra govt decided to reduce working hours of women police personnel from 12 hours to 8 hours
वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे म्हणाले की, राज्य सरकारने महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास 12 वरून 8 करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पुणे ग्रामीण पोलिसांनी महिला पोलिस कॉन्स्टेबलसाठी आठ तासांच्या शिफ्ट सुरू केल्या. जर हा उपक्रम यशस्वी ठरला तर, आठ तासांची शिफ्ट पुरुष पोलीस कॉन्स्टेबलसाठीही केली जाईल,” असे पुणे ग्रामीण पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
Maharashtra govt has decided to reduce the working hours of women police personnel from 12 hours to 8 hours: Maharashtra DGP Sanjay Pandey (File pic) pic.twitter.com/boa7jUJVtY — ANI (@ANI) September 24, 2021
Maharashtra govt has decided to reduce the working hours of women police personnel from 12 hours to 8 hours: Maharashtra DGP Sanjay Pandey
(File pic) pic.twitter.com/boa7jUJVtY
— ANI (@ANI) September 24, 2021
एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पोलिस दलात कर्तव्यावरील महिलांना बारा तास काम करावे लागते. महिला पोलिसांना त्यांच्या कामासोबत कौटुंबिक जबाबदारीही पार पाडावी लागते. बऱ्याच वेळा सण-उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरापासून अनेक वेळा या महिला कर्मचाऱ्यांना 12 तासांपेक्षा जास्त तास आपले कर्तव्य बजावावे लागते. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या हितासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे आणि गृहमंत्री मा. दिलीप वळसे-पाटील जी यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभार. @CMOMaharashtra @Dwalsepatil @maharashtra_hmo — Supriya Sule (@supriya_sule) September 24, 2021
हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे आणि गृहमंत्री मा. दिलीप वळसे-पाटील जी यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभार. @CMOMaharashtra @Dwalsepatil @maharashtra_hmo
— Supriya Sule (@supriya_sule) September 24, 2021
या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत सरकारचे आभार मानले. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, ‘महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलिस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणं शक्य होणार आहे.’
Maharashtra govt decided to reduce working hours of women police personnel from 12 hours to 8 hours
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App