शिंदे-फडणवीस सरकारकडून परमबीर सिंह यांचं निलंबन मागे!

2nd extortion case filed against ex-Mumbai top cop Param Bir Singh In Thane

महाविकास आघाडी सरकार काळात झालेले सर्व आरोपही रद्द केले

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. Maharashtra government drops all charges against former Mumbai police commissioner Param Bir Singh

भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र आता शिंदे-फडणवीस  सरकारच्या या नवीन निर्णयानंतर निलंबनाच्या कालावधीत परमबीर सिंह हे सेवेवर होते, असं गृहीत धरलं जाणार आहे.

परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. यानंतर मोठी खळबळ माजली होती, शिवाय अनिल देशमुखांना तुरुंगातही जावे लागले. परमबीर सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट पत्र पाठवले होते आणि पोलिसांना विविध ठिकाणांहून पैसे गोळा करायला  सांगितले जातात, पैसे गोळा करण्याचे टार्गेट दिलं जातं, असे आरोप परमबीर सिंह यांनी  केले होते.

याशिवाय दुसऱ्या बाजूला परमबीर सिंह यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.  विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने डिसेंबर २०२१ मध्ये त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.

Maharashtra government drops all charges against former Mumbai police commissioner Param Bir Singh

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात